घरमहाराष्ट्रउदयनराजे भोसलेंमुळे जनतेला १८ कोटींचा भुर्दंड!

उदयनराजे भोसलेंमुळे जनतेला १८ कोटींचा भुर्दंड!

Subscribe

उदयनराजे भोसलेंच्या राजीनाम्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी १८ कोटींचा अतिरिक्त खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता असून त्याचवेळी सातारा लोकसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक देखील होण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या ६ महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्याची खासदारकीची जागा रिकामी झाली आहे. तीच भरण्यासाठी तिथे पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला आणि पर्यायाने कररुपाने जमा झालेल्या जनतेच्या तिजोरीला १८ कोटींचा अतिरिक्त भुर्दंड बसणार आहे!

विधानसभेसाठी ९१३ कोटींचा खर्च

शुक्रवारी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात उदयनराजे भोसलेंनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली असून पोटनिवडणुकीसाठी देखील विधानसभेसोबतच मतदान होण्याची शक्यता आहे. एका विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी सुमारे ३ कोटींचा खर्च येतो. आणि लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे एका लोकसभा मतदारसंघात निवडणूक घेण्याचा खर्च १८ कोटींच्या घरात जातो, अशी माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयातल्या सूत्रांनी दिली. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी साधारणपणे ९१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता नारायण राणेही म्हणतात ‘आमचं ठरलंय’! ८ दिवसांत भाजपमध्ये जाणार!

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शपथविधी?

शुक्रवारी निवडणुकीची घोषणा झाल्यास पुढच्या महिन्यात १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. त्यानुसार २१ किंवा २२ तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. त्या हिशोबाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -