युतीच्या ‘फिल गुड’ला आघाडीचे तगडे आव्हान!

जिल्ह्यातील एकूण 15 विधानसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी गेल्या निवडणुकीप्रमाणे ‘सेम टू सेम’ सामना रंगणार असून, उर्वरीत आठ मतदारसंघांमध्ये नवीन-जुन्या उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाली आहे.

NASHIK
Nashik Election

प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 विधानसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी गेल्या निवडणुकीप्रमाणे ‘सेम टू सेम’ सामना रंगणार असून, उर्वरीत आठ मतदारसंघांमध्ये नवीन-जुन्या उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाली आहे.

नाशिक शहरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सुफडा साफ होईल, अशी स्थिती असताना आमदार बाळासाहेब सानप, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.हेमलता पाटील यांनी युतीसमोर आव्हान निर्माण केले आहे. तसेच देवळाली या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांना भाजपच्या बंडखोर तथा राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज अहिरे यांनी आव्हान दिल्यामुळे गलितगात्र झालेल्या पक्षाला चेतना मिळाली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांच्या रुपाने मतदारांना पर्याय मिळाला असला तरी येथील लढाई आता तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणार असल्याचे दिसते. एकंदरीत, निवडणूकीपूर्वी भाजप-शिवसेनेनी निर्माण केलेल्या ‘फिल गुड’ वातावरणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तुल्यबळ उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आता सर्वच मतदारसंघांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणार असल्याचे दिसून येते.

मालेगाव बाह्य-मध्य

शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमोर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी आव्हान निर्माण केले आहे. सोमवारी मालेगाव बाह्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवार संदीप पाटील व मोहम्मद इस्माईल जुम्मन या दोघांनी यांनी माघार घेतली. येथे एकूण १३ उमेदवारांपैकी २ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले; तर २ उमेदवारांनी माघारी घेतल्याने ९ उमेदवार रिंगणात आहेत. येथे ६ अपक्ष उमेदवार कायम आहेत.

मालेगाव मध्य

या मतदारसंघातून एमआयएम गटनेते डॉ.खालिद परवेज यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मध्य मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून एकूण १३ उमेदवार रिंगणात असून यात राजकीय पक्षांचे उमेदवार सोडले तर १० अपक्ष उमेदवार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here