घरमहाराष्ट्रराजकारण आणि क्रिकेट; गडकरींच्या वक्तव्यावर थोरात-पवारांची बॅटिंग

राजकारण आणि क्रिकेट; गडकरींच्या वक्तव्यावर थोरात-पवारांची बॅटिंग

Subscribe

महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार? हा प्रश्न आता देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलेला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात ‘राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते’, असे वक्तव्य केले होते. गडकरींच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय नेत्यांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गडकरींच्या वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे.

गडकरी म्हणाले की, “राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच हरणार असं वाटत असताना अचानक मॅच जिंकली जाते. तसंच राजकारणाचंही आहे.” गडकरींच्या वक्तव्याबाबत बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, “गडकरींचा थोडा गैरसमज झालेला आहे. क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक असतो. कारण क्रिकेटमध्ये निदान बॉल तरी दिसतो. मात्र राजकारणात बॉल दिसत नाही.”

- Advertisement -

तर नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी देखील गडकरींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “मी क्रिकेट खेळत नाही, पण मी क्रिकेटचा ऑर्गनायजर आहे.” असे पवार म्हणाले. म्हणजेच क्रिकेटच्या बाहेर राहून मी क्रिकेटचं आयोजन करतो, असे त्यांना सुचवायचे होते. हेच सूत्र राजकारणाच्या बाबतीत पवारांना तंतोतंत लागू पडते, हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -