घरमहाराष्ट्रहिमालयासमोर ठामपणे उभा सह्याद्री म्हणजे शरद पवार - सुप्रिया सुळे

हिमालयासमोर ठामपणे उभा सह्याद्री म्हणजे शरद पवार – सुप्रिया सुळे

Subscribe

दिल्लीच्या तख्तालाही न घाबरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार, असा उल्लेख बारामतीमधील शेवटच्या सभेत सुप्रिया सुळेंनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या दोन आठवड्यांपासून चाललेला प्रचार आता थंडावला आहे. आज बारामती येथे पवार कुटुंबियांनी परंपरेनुसार शेवटची सभा घेत प्रचाराला पुर्णविराम दिला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सातारा येथे भाषण करताना पवार साहेबांनी दिल्लीचे तख्तच काय तर कुणालाही घाबरत नसल्याचा इशारा दिलाय. आज हिमालयासमोर जर कुणी ठामपणे उभा असेल तर माझा सह्याद्री उभा आहे आणि त्या सह्याद्रीचे नाव शरद पवार आहे”

…अरे ते माझेही बाप आहेत

तत्पुर्वी इंदापूर येथील सभेत तरुणांनी पवारांना उद्देशून “कोण आला रे, कोण आला, मोदी-शाहाचा बाप आला” अशी घोषणाबाजी केली होती. त्यावर सुप्रिया सुळेंनी मिश्किल टिप्पणी केली की, “तुम्ही घोषणा देताय, पण ते माझेही बाप आहेत हे विसरु नका.”

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आल्यास सर्वात आधी ते महापोर्टल आम्ही बंद करु आणि कै. आर. आर. पाटील यांच्यासारखी जशी भरती सुरु केली होती. तशीच भरती पुन्हा सुरु करुन तरुणांना नोकरी देण्याचे काम करु, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी आज आपल्या भाषणात दिली. या भाषणाची क्लिप देखील त्यांनी आपल्या ट्विटरवर अपलोड केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -