घरमहाराष्ट्रसाताऱ्यात झालेली शरद पवारांची सभा प्रत्येकाला प्रेरणा देणारी - अमोल कोल्हे

साताऱ्यात झालेली शरद पवारांची सभा प्रत्येकाला प्रेरणा देणारी – अमोल कोल्हे

Subscribe

शरद पवारांची सातारा येथील भर पावसात झालेली सभा राजकारणात प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी होती. निसर्गाला देखील त्यांनी आव्हान दिल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भोसरी मतदार संघातील अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांची रॅली आयोजित करण्यात आली होती.

या दुचाकी रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळ पासूनच कामाला सुरुवात केली. भोसरी मतदारसंघात गुरु विरूद्ध चेला अशी रंगत बघायल मिळत आहे. त्यातच खासदार अमोल कोल्हे यांच्या रॅलीमुळे वारे फिरल्याच बोलले जात आहे.

- Advertisement -

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, आज ७९ वर्षाचे तरुण शरद पवार हे निसर्गालाही आव्हान देत सभा घेत आहेत. निसर्ग देखील त्यांना मनाचा मुजरा करतोय, शरद पवार यांची लाट होतीच, ती आणखीन मोठी कृतज्ञतेची लाट तयार झाली आहे. ५५ वर्ष महाराष्ट्राच्या जडण घडणीत योगदान दिल्यानंतर आज महाराष्ट्र पुन्हा चुकीच्या हातात जाऊ नये, भारतीय जनता पक्षाच्या हातात जाऊ नये, म्हणून शरद पवार एका लढवय्या प्रमाणे लढत आहेत आणि हा महाराष्ट्र पवार यांना साथ दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -