घरमुंबईकोळंबकरांविरोधातील नाराजी शिवकुमार लाड यांच्या पथ्यावर!

कोळंबकरांविरोधातील नाराजी शिवकुमार लाड यांच्या पथ्यावर!

Subscribe

सलग सात वेळा विधानसभेवर निवडून येऊनही वडाळा मतदारसंघात स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी कोणतीही ठोस कामे केलेली नाहीत. मुख्य म्हणजे काँग्रेसमधून आयात केलेल्या कोळंबकरांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. ही नाराजी शिवकुमार लाड यांसारख्या काँग्रेसच्या तरुण उमेदवाराच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र या परिसरावर एक नजर टाकली असता दिसून येत आहे. युवा चेहरा असलेल्या लाड यांनी गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने मतदारांना त्यांच्या नावाची नव्याने ओळख करण्याची गरज भासत नाही, हे विशेष!

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही कोळंबकर यांना नशिबाने साथ दिली. शिवसेना-भाजप युती तुटल्याचा त्याने फायदा झाला. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कोळंबकर यांनी युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्याचा कोणताही फायदा शेवाळे यांना झाला नाही. मात्र शेवाळे निवडून आल्यामुळे कोळंबकर यांची निष्क्रियता झाकली गेली. त्यामुळे शेवाळेंसह शिवसैनिकही कोळंबकर यांच्यावर नाराज आहेत. शेवाळे यांना येथून ७३ हजार ४१५ मते मिळाली आहेत. आधी युती नसताना आणि नंतर युती असताना युतीच्या उमेदवारांना जी मते पडली आहेत, त्यात केवळ चार हजार मतांचाच फरक आढळून येतो. कोळंबकर यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ३८ हजार ५४० मते मिळाली होती. त्यामुळे युतीला पडलेल्या मतांमध्ये या मतांची भर पडायला पाहिजे होती, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामध्ये केवळ ४ हजार मतांची भर पडली. त्यामुळे युतीचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत.

- Advertisement -

या मतदारसंघावर आजही शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांची पकड आहे. मात्र ही जागा भाजपला गेली व श्रद्धा जाधव यांचा पत्ता कट झाला. साहजिकच त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. भाजपचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते बाबुभाई भवानजी यांनाही भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजपचे कट्टर कार्यकर्ते नाराज झाले. या सर्व नाराजीचा फायदा अर्थात शिवकुमार यांना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वडाळा मतदारसंघाने कायम काँग्रेसला मोठी साथ दिली आहे. नायगाव, शिवडी-कोळीवाडा, भोईवाडा, कोरबा मिठागर असा परिसर या मतदारसंघात येतो. येथे गिरणी कामगार, मुस्लीम, दलित, ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे आणि सर्व भाषिक मतदार आहेत. मागील निवडणुकांत कोळंबकर यांना नायगाव, कोरबा मिठागर, शिवडी क्रॉस रोड या परिसरातील मतदारांनी भरभरून मते दिली. ही काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक आहे. या बँकेचे दान यावेळी शिवकुमार यांच्या बाजूने पडणार आहे. याशिवाय माटुंगा आणि परिसरातील नागरिकांचाही त्यांना प्रतिसाद मिळत असल्याने कोळंबकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -