घरमहाराष्ट्र'शिवसेनेने युती धर्म पाळला नाही'; भाजपचा आरोप

‘शिवसेनेने युती धर्म पाळला नाही’; भाजपचा आरोप

Subscribe

शिवसेनेने युती धर्म पाळला नसल्याने सिंधुदुर्गात युती तुटल्याचे संकेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले आहे.

कणकवलीमध्ये शिवसेनेने युती धर्मा पाळला नाही, असा घणाघाती आरोप भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला आहे. कणकवली मतदारसंघातून भाजपने अखेर नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे राणे यांचे खंदे समर्थक सतीश सावंत यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत रंगतदार होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात युतीवरील सावट कायम आहे. शिवसेनेने युती धर्म पाळला नसल्याने सिंधुदुर्गात युती तुटल्याचे संकेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत प्रमोद जठार यांनी युतीबाबतचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा – धक्कादायक! राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद

- Advertisement -

नेमके म्हणाले प्रमोद जठार?

‘सिंधुदुर्गात भाजपने युती धर्माचे पालन केले आहे. शिवसेनेने मात्र युती धर्म पाळला नाही. स्वाभिमान विलिनीकरण आणि नितेश राणे उमेदवारी हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचा आहे’, असेही जठार म्हणाले. याशिवाय आमचा उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा शिवसेनेला काय अधिकार? हा तर शिवसेनेचा वैचारिक बलात्कार आहे. आमच्या प्रदेश नेतृत्वाला आणि केंद्रीय नेतृत्वाला शिवसेनेने चॅलेंज दिले आहे. येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेने अर्ज मागे घ्यावा. अन्यथा युद्ध अटळ आहे, असेही प्रमोद जठार म्हणाले.

नितेश राणेंना विजयी करण्याचे आवाहन

प्रमोद जठार यांनी नितेश राणेंना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. ‘गेले ४० वर्ष शिवसेना नेते म्हणून काम करणाऱ्या नेत्याच्या मुलाला उमेदवारी देऊन आम्ही बाळासाहेब आणि शिवसेनेचा सन्मान राखला आहे’, असे जठार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -