घरमहाराष्ट्रसत्ता स्थापनेत शिवसेनेलाही अपयश, आता राज्यात काय होणार?

सत्ता स्थापनेत शिवसेनेलाही अपयश, आता राज्यात काय होणार?

Subscribe

राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी २४ तास दिले होते. मात्र, शिवसेना देखील सत्ता स्थापनेत अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आलेल्या पेच प्रसंगामुळे राज्यातील राजकारणाने धक्कादायक वळण घेतलेले चित्र दिसत आहे. राज्यात पहिल्यांदाच एकमेकांविरोधात कित्येक वर्षे विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यता दिसून येत होती. मात्र, ही शक्यता आता धूसर दिसू लागली आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी २४ तास दिले होते. मात्र, शिवसेना देखील सत्ता स्थापनेत अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आदित्य ठाकरे

‘रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्यपालांचे पत्र मिळाले. त्यानुसार आम्ही २४ तासांच्या आत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांसोबत चर्चा सुरु केली. दरम्यान, आज सायंकाळी ७.३० वाजेपर्यंतचा मुदत देण्यात आली होती. तसेच राज्यपालांकडे मुदत वाढवून मागितली होती. मात्र, वेळ वाढवून देण्यासाठी राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. मात्र, दावा नाकारलेला नाही’, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

कॉंग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेकडे पाठिंब्याचे पत्र दिल्याचे वृत्त असताना शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. याबाबतचा संदेश त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला होता. त्याप्रमाणे शिवसेनेने राज्यापालांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, सेनेला मुदतवाढ नाही, राजभवनाचे अधिकृत निवेदन दिले आहे.


हेही वाचा – शिवसेनेला डिवचण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -