घरविधानसभा २०१९शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आमदाराचीच बंडखोरी; तृप्ती सावंत अपक्ष लढणार!

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आमदाराचीच बंडखोरी; तृप्ती सावंत अपक्ष लढणार!

Subscribe

विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून डिच्चू दिल्यामुळे तृप्ती सावंत आता अपक्ष म्हणून निवडणुीच्या रिंगणात उतरणार आहेत.

वांद्रे पूर्व मतदारसंघातून मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे तृप्ती सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत तृप्ती सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणुीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागणार असल्याचे दिसून येत आहे.

तृप्ती सावंत यांच्यावर अन्याय

तृप्ती सावंत यांचे तिकीट रद्द केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय केला असल्याचे मत त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात आले आहे. तसेच दिवंगत आमदार बाळा सावंत यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. परंतु, यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे नाराज तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

महापौरांनी मानले आभार

शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘वांद्रे पूर्व’ या मतदारसंघाचा तिढा सोडवताना शिवसेना पक्षप्रमुखांची चांगलीच दमछाक झाली आहे. तर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डच्चू देत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली आहे. त्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.


हेही वाचा – भाजपचा नवा ट्वीस्ट! चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्नीला दिली उमेदवारी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -