घरमुंबई'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा' मातोश्रीबाहेर बॅनरबाजी

‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा’ मातोश्रीबाहेर बॅनरबाजी

Subscribe

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ते आतापर्यंत शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक आहे. निकाल लागूनही महाराष्ट्रात अजूनही सरकार स्थापन झालेलं नाही. सत्तेचा पेच कायम असल्यामुळे नवं सरकार कधी स्थापन होणार याविषयी प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावानंतर आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्याची मागणी शिवसैनिकांनी बॅनरमधून केली आहे. मातोश्रीबाहेर तशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे’, असे या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.


हेही वाचा – ठरलं, काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?

- Advertisement -

नेमकं काय लिहिलं आहे पोस्टरवर?

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे’, असे पोस्टर मातोश्रीबाहेर लावण्यात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, अशी देखील मागणी करण्यात आली होती. आणि आता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करा अशी पोस्टरबाजी करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. पण, शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -