घरमुंबईपालघरचे बंडखोर अमित घोडा पुन्हा शिवसेनेत

पालघरचे बंडखोर अमित घोडा पुन्हा शिवसेनेत

Subscribe

पालघर विधानसभा निवडणुकीसाठी नाट्यमय घडामोड घडली आहे. येथील मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे विद्यमान आमदार अमित घोडा प्रचंड नाराज होते. त्यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले. त्यांनी शिवसेनेचा त्याग करत राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. मात्र, दोन ते चार दिवसांत पुन्हा ते स्वगृही परतले. त्यामुळे पालघरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. अमित घोडा यांनी पुन्हा हातावर शिवबंधन बांधले आहे.

पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषीत करण्यात आली होती. मात्र, लोकसभेत युती झाल्याने भाजपचा उमेदवार शिवसेनेत घेत राजेंद्र गावित यांना लोकसभेवर पाठविण्यात आले. त्यानंतर वनगा नाराज होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द विधानसभेची उमेदवारी देऊन पूर्ण केला. मात्र, यामुळे विद्यमान आमदार अमित घोडा प्रचंड नाराज झाले. त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला.

- Advertisement -

सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आमदार अमित घोडा यांचे मन वळविण्यात शिवसेनेला मोठे यश आले. राष्ट्रवादीत दाखल झालेले अमित घोडा स्वगृही परतले आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्का देणार्‍या राष्ट्रवादीलाच धक्का बसला आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी श्रीनिवास वनगांना थांबवून राजेंद्र गावितांना तिकीट देण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वनगा यांना विधानसभेचे तिकीट देण्याची ग्वाही दिली होती. दरम्यान, शिवसेनेकडून वनगा यांना उमेदवारी मिळाल्याने विद्यमान आमदार अमित घोडा नाराज झालेत. पालघर जिल्हा परिषदचे शिवसेना गट नेता प्रकाश निकम यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. विक्रमगड मतदार संघातून प्रकाश निकम 2014 मध्ये शिवसेनेकडून लढले होते. त्यांनी भाजपचे विष्णू सावरा यांना कडवी झुंज दिली होती. हा मतदार भाजपला सोडला गेल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -