घरमहाराष्ट्रपवारांच्या अनुभवाचा मोरंबा भाजपच्या श्रेष्ठींना चाखता आला नाही - शिवसेना

पवारांच्या अनुभवाचा मोरंबा भाजपच्या श्रेष्ठींना चाखता आला नाही – शिवसेना

Subscribe

'नरेंद्र मोदी यांनी पवारांना ऑफर दिली होती. महाराष्ट्राचे सरकार भाजपबरोबर बनवा, असे मोदी म्हणाले होते. यासाठी केंद्रात देखील मंत्रीपदे देण्याची ऑफर मोदींनी दिली होती', असा गौप्यस्फोट पवारांनी केला. याच गौप्यस्फोटानंतर शिवसेनेने भाजपचा 'सामना'तून समाचार घेतला आहे.

‘पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवरांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय है! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडला’, अशा शब्दांत शिवसेनेने आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली होती? याबाबत माहिती दिली. ‘नरेंद्र मोदी यांनी पवारांना ऑफर दिली होती. महाराष्ट्राचे सरकार भाजपबरोबर बनवा, असे मोदी म्हणाले होते. यासाठी केंद्रात देखील मंत्रीपदे देण्याची ऑफर मोदींनी दिली होती’, असा गौप्यस्फोट पवारांनी केला. याच गौप्यस्फोटानंतर शिवसेनेने भाजपचा ‘सामना’तून समाचार घेतला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सकारात्मक होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिनही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली आणि या आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे ठरवले. यासाठी काँग्रेसच्या हायकमांड सोबत चर्चा करण्यासाठी पवार दिल्लीला गेले होते. राज्यातील ओल्या दुष्काळाची परिस्थिती पाहता पवारांनी शेतकऱ्यांना मदतीचे निवेदन पंतप्रधानांना द्यावे, अशी विनंती शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांना केली होती. याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतही सांगितली होती. मात्र, जेव्हा शरद पवार मोदींना शेतकऱ्यांचे मदत करण्याचे निवेदन करायला गेले तेव्हा मोदींनी पवारांना सत्ता स्थापन करण्याची आणि केंद्रीय मंत्रीपदांची ऑफर दिल्याची बाब समोर येत आहे.

- Advertisement -

‘पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल’

‘निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी मोदी-शहा यांना साडेपाच वर्षे का लागलीत हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा कावा होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवरांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय है! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल’, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -