घरमहाराष्ट्रपुण्यात युतीला हरताळ! कसब्यात शिवसेना वि. भाजप!

पुण्यात युतीला हरताळ! कसब्यात शिवसेना वि. भाजप!

Subscribe

पुण्यातल्या इतर सर्व मतदारसंघातल्या शिवसेना उमेदवारांची बंडखोरी मोडून काढण्यात यश आलं असलं, तरी कसबा पेठ मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी मात्र निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक पक्षांतरं झाली. सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकीकडे तर विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुसरीकडे आघाडीमध्ये विधानसभा निवडणुका लढणार आहेत. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपात अनेक ठिकाणी दुसऱ्या पक्षाचे उमेदवार तिकीट न मिळाल्यामुळे नाराज दिसत होते. त्यामुळे अपेक्षेनुसार दोन्ही पक्षांमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे. आणि या बंडोबांना शांत करण्यासाठी पक्षातल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ नेतेमंडळींना धावपळ करावी लागत आहे. तसाच काहीसा प्रकार पुण्यातल्या सर्व आठ मतदारसंघांमध्ये दिसून येत होता. मात्र, तिथली बंडखोरी शांत करण्यात हे पक्ष यशस्वी झाले असले, तरी गिरीश बापट निवडून जात असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघामधला पेच कायम आहे. तिथले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. ‘कसब्यातून शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय मातोश्रीवर पाय ठेवणार नाही’, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाचा पेच आता शिवसेना कशी सोडवणार? याची उत्सुकता इथल्या मतदारांना लागली आहे.

कसब्यात भगवा फडकविल्याशिवाय मातोश्रीवर जाणार नाही

पुण्यातील कसबा मतदारसंघ जिंकल्याशिवाय मातोश्रीची पायरी चढणार नाही, असा निर्धार शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी केला आहे.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 7, 2019

- Advertisement -

शिवसेना भाजपला घेणार शिंगावर!

जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार पुण्यातले आठही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली होती. एकही मतदारसंघ न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या स्थानिक शिवसेना नेत्यांनी बंडखोरी केली. त्यामध्ये वडगाव शेरी येथून महापालिकेतील माजी गटनेते संजय भोसले, खडकवासला मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून नगरसेविका पल्लवी जावळे, हडपसर मतदार संघातून गंगाधर बधे यांनी बंडखोरी केली होती. मात्र, या सगळ्यांनी पक्षनेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर आपल्या तलवारी म्यान केल्या. परंतु, कसबा मतदारसंघातले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी मात्र भाजपला थेट शिंगावर घेत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मुक्ता टिळक यांचा पेपर अवघड!

कसबापेठ मतदारसंघातून २०१४मध्ये गिरीश बापट निवडून गेले होते. मात्र, त्यांनी २०१९मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर ते खासदार झाले. त्यामुळे भाजपनं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना यंदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांची बेरीज केल्यास आणि शिवसेना उमेदवाराची बंडखोरी विचारात घेतल्यास मुक्ता टिळक यांचा कसबा पेठचा पेपर अवघड जाणार अशी चिन्ह दिसत आहेत.

- Advertisement -

कसबापेठ मतदारसंघातली राजकीय गणितं, वाचा सविस्तर!

काँग्रेस-राष्ट्रवादीलाही बंडखोरीची लागण

दरम्यान, सेना-भाजपप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये देखील पुण्यात बंडखोरी दिसून आली. कसबा मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, पर्वती विधानसभा मतदारसंघातून माजी उपमहापौर आबा बागुल यांनी बंडखोरी केली होती. काँग्रेस आघाडीतील ही बंडखोरी रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आदी नेत्यांनी बंडखोरी करणाऱ्यांशी मोबाईलवर थेट संपर्क साधला. तसेच स्थानिक पातळीवरील नेते बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, अंकुश काकडे आदींनी देखील बंडखोरी करणाऱ्यांची मनधरणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -