घरमहाराष्ट्रठाकरे बंधूंची एकाच दिवशी पुण्यात सभा

ठाकरे बंधूंची एकाच दिवशी पुण्यात सभा

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच राज्यात विविध पक्षांतर्फे जाहीर सभांचा धडाका सुरु होणार आहे. या मध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी पुण्यातील अलका टॉकिज येथे होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही जाहीर सभा त्याच दिवशी पिंपरी येथे होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी पुण्यात बाजूबाजूला ठाकरे बंधूंची सभा पडणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला मैदान उपब्ध होत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे अलका टॉकिज चौकात सभेला संमती दिली जावी, अशी मागणी पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून मनसेच्या सभांचा शुभारंभ ९ तारखेला होणार आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शुभारंभाची सभा कसबा मतदारसंघात होणार आहे. त्यासाठी मनसेने टिळक रोड व शनिवार पेठ भागातील रमणबाग शाळेकडे परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी देण्यात आली नाही. सरस्वती विद्या मंदिर मैदानासाठीचा अर्ज करण्यात आला होता, मात्र ते मैदान उपलब्ध होत नाही. पावसाळ्यामुळे डेक्कन या ठिकाणी नदीपात्रात सभा घेता येणार नाही, असेही मनसेच्या पदाधिकार्‍यांना कळवण्यात आले होते. पुणे शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सभांसाठी मैदान मिळत नसल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतले उमेदवार अजय शिंदे यांनी केला होता. शैक्षणिक संस्थांची मैदाने उपलब्ध होत नसल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे करण्यात आली. कोणतीच मैदाने उपलब्ध होत नसतील तर टिळक चौकाची जागा सभेसाठी देण्यात यावी अशी विनंती मनसेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –

होय, मी सत्तेसाठीच युती केली – उद्धव ठाकरे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -