घरमुंबईखडखडाट असलेल्या तिजोरीमुळे 'नव्या सरकार'च्या मॅरेथॉन बैठका

खडखडाट असलेल्या तिजोरीमुळे ‘नव्या सरकार’च्या मॅरेथॉन बैठका

Subscribe

विशेष अधिवेशन संपल्यानंतर देखील उशिरापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यासोबत बैठक घेऊन कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल, यावर देखील दीर्घ चर्चा

महाविकास आघाडी अर्थात ठाकरे सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र आता या सरकारपुढे खरे आवाहन आहे ते राज्याची खडखडाट झालेली तिजोरी भरून शेतकरी कर्जमाफी तसेच राज्यातील सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे. यामुळे या सगळ्यावर सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री बैठकावर बैठका घेत आहेत. विशेष अधिवेशन संपल्यानंतर देखील उशिरापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यासोबत बैठक घेऊन कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल, यावर दीर्घ चर्चा केल्याची माहिती मंत्री मंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरशी खासगीत बोलताना दिली. ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार बनवायचे हे ठरले त्या दिवसापासूनच राज्याच्या आर्थिक तिजोरीचा अंदाज घेऊनच राज्याचा कारभार कसा हाकता येईल, याचा आम्ही अंदाज घेतल्याचे देखील या नेत्याने सांगितले. एवढच नाही आव्हाने खूप आहेत पण त्यावर देखील मार्ग निघेल असा विश्वास आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारला असल्याचे या नेत्याने बोलताना सांगितले.

शेतकरी कर्जमाफी हे प्रमुख प्राधान्य

दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना लवकरात पैसे कसे देता येतील याला प्राधान्य दिले आहे. तर लवकरच यावर देखील निर्णय होईल, असे मंत्रीमंडळ बैठकीत ठरल्याचे या नेत्याने सांगितले. एवढेच नाही तर सध्या अवकाळी पावसाळामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यामध्ये फळबागांचे देखील नुकसान झाले आहे. याचा देखील आढावा घेऊन मदत केली जाणार असल्याचे या नेत्याने सांगितले.

- Advertisement -

८० टक्के पूर्ण झालेले प्रकल्प मार्गी लावणार

सध्या राज्यावर साडे चार लाख कोटी इतके कर्ज असल्याने ज्या प्रकल्पाचे काम ८० टक्के किंवा त्याहून पूर्ण झाले आहे ते प्रकल्प आधी मार्गी लावायचे. त्यानंतरच दुसऱ्या नव्या प्रकल्पाना हात घालायचा असे देखील बैठकीमध्ये ठरल्याचे समजत आहे. एवढंच नाही तर मेट्रो प्रकल्प देखील मार्गी लागेल, असे देखील या नेत्याने सांगितले. आम्ही मेट्रो प्रकल्पाला स्थगिती दिली नसून, फक्त आरे येथील कामाला दिल्याचे सांगितले. आरे ऐवजी दुसरी कोणती जागा उपलब्ध आहे का याची देखील चाचपणी सुरू असल्याचे या नेत्याने सांगितले.


हेही वाचा – लोकसभेचे सभापती भाजप खासदारावर भडकले; म्हणे, ‘केंद्र सरकार नळ बसवणार का?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -