ठरलं, काँग्रेसचे हे दोन आमदार आज शपथ घेणार

Nitin Raut and Balasaheb Thorat

चौदाव्या विधानसभेसाठी आज मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेणार आहेत. मात्र काँग्रेसकडून अद्याप कोणतीही नावे जाहीर करण्यात येत नव्हती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव मंत्रीपदासाठी निश्चित झालेले आहेच. मात्र दुसऱा आमदार कोण? यावर प्रश्नचिन्ह कायम होते. काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही निर्णय घेत नाही, अखेरच्या क्षणी नावे जाहीर करण्याची काँग्रेसची ही पद्धत आहेत. यावेळी देखील काँग्रेसने तेच केले आहे. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत हे आज शिवाजी पार्कवर शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

कोण आहेत नितीन राऊत?

नाना पटोले हे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. २०१४ साली त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. २०१९ साली पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. विदर्भातील मागासवर्गीय नेता म्हणून नितीन राऊत यांना ओळखले जाते. राऊत हे पेशाने पायलट होते.