घरमहाराष्ट्रथकलेले लोक तुमचं भलं करु शकतात का? - नरेंद्र मोदी

थकलेले लोक तुमचं भलं करु शकतात का? – नरेंद्र मोदी

Subscribe

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते स्वतःच सागंत आहेत की आम्ही थकलेले आहोत. मग असे थकलेले, हरलेले लोक जनतेचे नेतृत्व काय करणार? म्हणून युतीला साथ द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळी येथील जाहीर सभेत केले. “आमची कार्यशक्ती आणि त्यांची स्वार्थशक्ती असा हा मुकाबला आहे. लोक कार्यशक्तीच्या पाठिशी उभे राहतील.”, असेही मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही थकलो असून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले पाहीजे, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर भाजप तसेच राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी या वक्तव्यावर टीका केली होती. हाच धागा पकडून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेस-राष्ट्रवादीवर शरसंधान साधले.

“बीडमध्ये आल्यानंतर दोन दोन देवांचे एकत्र दर्शन करण्याच योग आला. परळी आल्यानंतर बाबा वैद्यनाथ यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर जनतेचे दर्शन घेतले. बीडने नेहमीच भाजपला आशिर्वाद दिलेला आहे. बीडने मला गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासारखे मित्र दिले. आज ते आपल्यात नाहीत, मात्र जिथे कुठे असतील तिथून ते पंकजा मुंडे यांना आशीर्वाद देत असतील.” असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले.

- Advertisement -

२१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान आहे. त्याआधी १९ आणि २० ऑक्टोबरला अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्यामुळे एकत्र सुट्ट्यावर जाऊ नका, असेही आवाहन पंतप्रधानांनी केले. ज्याप्रमाणे पुर्ण गाव दिवाळी एकत्र साजरी करतो, त्याप्रमाणे २१ तारखेला पुर्ण कुटुंबाने एकत्र जाऊन मतदारन करावे, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -