घरमहाराष्ट्र'धरणं भरण्यापेक्षा, जेवण करणे कधीही चांगले'; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

‘धरणं भरण्यापेक्षा, जेवण करणे कधीही चांगले’; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

Subscribe

'धरणं भरण्यापेक्षा, जेवण करणे कधीही चांगले' असा टोला उद्धव ठाकरेंनी पवारांना लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून काही दिवसांपूर्वी वचननामा जाहीर करण्यात आला होता. या वचननाम्यात ‘पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयात जेवण’ देण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर येथील सभेत जोरदार टीका केली होती. ‘तुम्हाला राज्य चालवायला दिले आहे की, स्वयंपाक करायला?, असा पवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. त्यावर परांडा येथे झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी ‘धरणं भरण्या’पेक्षा स्वयंपाक करणं कधीही चांगले, असे प्रतिउत्तर दिले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘गोरगरीबांसाठी स्वयंपाक करायला मी कधीही तयार आहे. धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक करणे कधीही चांगले’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. तसेच ‘आपले विधान अंगलट आल्यानंतर अजित पवारांनी अश्रू ढाळले. आपल्याला देखील भावना आहेत हे त्यांना सांगावे लागते’,असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचा बुरखा टराटरा फाडला, असे देखील ते यावेळी बोले.

- Advertisement -

शरद पवारांची स्थिती ही शोलेमधील जेलर सारखी झाली असून आधे अधर जाओ, आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ. तसेच यांच्या पक्षातून देखील सगळे इकडे तिकडे गेले आहेत, यांच्या मागे कुणीच नाही, असे ही ते म्हणाले आहेत. तसेच रस्त्यांवरचे खड्डे बुजवणार असून चांगले रस्ते ग्रामीण भागांना देणार असल्याचेही शिवसेनेच्या वचन नाम्यात मांडण्यात आले आहे. मात्र, हे वचन देत असचताना काही खड्डे विरोधकांना गाडण्यासाठी ठेवणार आहोत, असे म्हणत त्यांनी विरोधकांचा पराभव निश्चित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यासोबतच सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासंदर्भात त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच जिथे पटणार नाही तिथे आवाज उठवणारच. शिवसेना गोरगरीबांचा बुलंद आवाज असल्याचे त्यांनी ठणकावून देखील सांगितले आहे.


हेही वाचा – तुम्हाला राज्य चालवायचेय की स्वयंपाक करायचाय!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -