घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या शपथविधीची तारीख बदलली!

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीची तारीख बदलली!

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदा मुख्यंमत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्या शपथविधीची अंतिम तारीख अखेर ठरली आहे. खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामध्ये शपथविधीचा दिवस आणि वेळ स्पष्ट केली आहे.

पहिला ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार पासून पहिला ठाकरे आमदार होईपर्यंतचा घटनाक्रम महाराष्ट्रानं पाहिलाच आहे. मात्र, आता त्यापाठोपाठ पहिला ठाकरे मुख्यमंत्री देखील होणार असल्याचं महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अवध्या ४ महिन्यांपूर्वीपर्यंत आजपर्यंत ठाकरे घराण्यातल्या कुणीही निवडणूक लढवली नाही असं म्हणणाऱ्या मतदारांना चारच महिन्यात एकाच झटक्यात दोन ठाकरे आमदार आणि त्यातले एक ठाकरे थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांचा शपथविधी अपेक्षेप्रमाणेच शिवाजी पार्कवर होणार आहे. मात्र, त्यांच्या शपथविधीची तारीख बदलण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रात्री उशिरा उद्धव ठाकरेंना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं असून येत्या ७ दिवसांमध्ये म्हणजेच ३ डिसेंबरपर्यंत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. त्यासोबतच राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसंदर्भात देखील या पत्रामध्ये निर्देश दिले आहेत.

शपथविधीसंदर्भात काय लिहिलंय पत्रामध्ये?

दरम्यान, या पत्रामध्ये ‘शिवसेनेने तोंडी विनंती केल्याप्रमाणे शिवाजी पार्कवर उद्धव टाकरेंचा शपथविधी होईल. तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची यादी माझ्याकडे येत्या ३ डिसेंबरपर्यंत पाठवू शकता’, असं राज्यपालांनी नमूद केलं आहे. उद्धव ठाकरेंचा शपथविधी १ डिसेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र, राज्यपालांच्या या पत्रानुसार ही तारीख आता बदलण्यात आली आहे. आता उद्धव ठाकरेंचा शपथविधी येत्या २८ नोव्हेंबर रोजीच म्हणजे उद्याच होणार असून संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी राज्यपाल त्यांना पदभाराची आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर तयारी सुरू झाली आहे.

- Advertisement -
Governor letter to Uddhav Thackeray
राज्यपालांचं उद्धव ठाकरेंना सत्तास्थापनेचं निमंत्रण
Governor Letter to Uddhav Thackeray
राज्यपालांचं उद्धव ठाकरेंना सत्तास्थापनेचं निमंत्रण

हेही वाचा – संजय राऊत म्हणतात, ‘भाजप अघोरी प्रयत्न करत होतं’!

सोनिया गांधी, राज ठाकरेंनाही निमंत्रण?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना देखील उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द शरद पवार सोनिया गांधींना शपथविधीसाठी निमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसविरोध जगजाहीर असतानाच पहिले ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना खुद्द सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर आता चर्चा होऊ लागली आहे. दुसरीकडे ठाकरे कुटुंबातील दुसरे ठाकरे म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील शपथविधीचं निमंत्रण जाणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंकडून हे निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील शपथविधीसाठी येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -