घरमुंबईमुख्यमंत्रीपदासाठी जे हवं ते करेन - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीपदासाठी जे हवं ते करेन – उद्धव ठाकरे

Subscribe

‘मी शिवसेना पक्षप्रमुखां वचन दिलं आहे की तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर बसवेन. एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. त्या मुख्यमंत्रीपदासाठी जे हवं ते करेन’, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत रंगशारदामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्याचं शिवसेनेकडून आयोजन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ‘मला कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे. प्रत्येक मतदारसंघात मला शिवसेना हवी आहे. २८८ मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद आपण वाढवली आहे’, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा स्वबळाचे संकेत दिलेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

बंडखोरांना दिला इशारा

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी पक्षातल्या संभावित बंडखोरांना इशारा दिला आहे. ‘लवकरच जागावाटप होईल. पण जागावाटप झाल्यानंतर मी बंडखोरी सहन करणार नाही. गद्दारी करायची नाही’, असं यावेळी ते म्हणाले. त्यासोबतच, ‘काहीही झालं, तरी गद्दारी करायची नाही’, अशी शपथ देखील त्यांनी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून घेतली.

- Advertisement -

पवारांना उद्धव ठाकरेंचा टोला

शरद पवार आणि अजित पवार यांच्याविषयी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. ‘शरद पवार यांच्या कौटुंबिक भांडणात मला रस नाही. त्यामुळे अजिबात त्याचा आनंद झालेला नाही. आपण संघर्ष करून ही सत्ता निर्माण केली आहे. पण जो कर्मानेच मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आम्ही कुणाशीही सूडासारखं वागत नाही. जे शिवसेनेशी वाईट वागले, त्यांचं मी कधीच वाईट चिंतत नाही. पण, त्याचं फळ त्यांना मिळतंय’, असा टोला त्यांनी यावेळी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांना लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना – LIVE

ShivSena ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -