घरमुंबईविक्रोळी युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात कोटकांची पाठ

विक्रोळी युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात कोटकांची पाठ

Subscribe

सुनील राऊतांविरोधात भाजपची नाराजी उघड

विक्रोळी मतदार संघात भाजपची नाराजी आता पूर्णपणे उघड झाली असून महायुतीचे उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचारात अद्यापही खासदार मनोज कोटक फिरकलेले नाही. कोटक यांनी प्रचारात सहभागी व्हावे,याकरता राऊत यांनी त्यांच्याशी संपर्कही साधलेला नाही. त्यामुळे आधीच अंतर्गत धगधगत असलेली आग आता वणव्यासारखी पेट घेत आहे. भाजपशिवाय आपण निवडून येवू, असा निर्धार राऊत करत असले तरी प्रत्यक्षात शिवसैनिकांना वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागत असल्याने राऊत हे स्वत:च आपला विजय कठिण करत असल्याचे बोलले जात आहे.

विक्रोळी विधानसभा मतदार संघात विद्यमान शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्यासमोर राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ, मनसेचे विनोद शिंदे,वंचितचे सिध्दार्थ मोकळे हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. परंतु, प्रमुख लढत आहेत ती शिवसेनेचे सुनील राऊत आणि राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ यांच्यामध्ये. सुनील राऊत हे मागील पाच वर्षांमध्ये काय काम केले हे सांगू शकत नाहीत आणि पुढील पाच वर्षांचे ध्येयही त्यांच्याकडे नाही. त्यातच राऊत यांनी भाजपशी जाहिरपणे पंगा घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे खासदार निवडून आल्यानंतरही शिवसेनेचे राऊत हे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांना विचारत नाहीत.

- Advertisement -

कोटक यांच्याकडे कुणी जावू नये असा फतवा त्यांनी आधीच काढला होता. परंतु विधानसभेला युती झाल्यानंतरही त्यांनी कोटक यांना प्रचारात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलेले नाही. त्यामुळे कोटकही राऊत यांच्या प्रचारात फिरकलेले नाही. त्यामुळे भाजपच्या धुसफुसीचा फायदा राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ उठवताना दिसत आहे. धनंजय पिसाळ आणि त्यांची पत्नी भारती पिसाळ हे सातत्याने नगरसेवक राहिलेले आहेत. शिवाय महापालिकेचे गटनेते असल्यामुळेही पिसाळ जनसंपर्क अधिक वाढवत चालले आहे. मात्र, भाजपसोबत नसली तरी चालेल असे म्हणत राउुत यांनी युती असूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बळावरच निवडणूक लढवण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे धनंजय पिसाळ, मनोज शिंदे, सिध्दार्थ मोकळे यांनी घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर दिला आहे.

मात्र, यासर्व उमेदवारांमध्ये पिसाळ हेच सरस उमेदवार असल्याने विक्रोळीतील जनता कुणाच्या पारड्यात मतदान टाकते याकडे सर्वांचे लक्ष राहिले आहे. एका बाजूला वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झालेले नाहीत, तर विक्रोळीत भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होताना दिसत नाही. त्यामुळे राऊत यांच्याविरोधातील नाराजीचा फायदा पिसाळ उठवताना दिसत आहे.

- Advertisement -

सभेसाठी न जाण्याचे फर्मान

वांद्रे-कुर्ला संकुलात शिवसेना- भाजप युतीची जाहिरसभा असल्याने सर्व शाखांमधून शिवसैनिक सभेला गेले होते. परंतु विक्रोळीचे उमेदवार सुनील राऊत यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या सभेला न जाण्याचे फर्मान सोडले होते. सभेला जाण्याऐवजी प्रचारात सहभागी व्हा,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -