घरमुंबईकडवे आव्हान नसल्याने मताधिक्य वाढवण्याचा पराग अळवणींना संधी

कडवे आव्हान नसल्याने मताधिक्य वाढवण्याचा पराग अळवणींना संधी

Subscribe

विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार ऍड पराग अळवणी हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र, मागील पाच वर्षांमध्ये अळवणी यांनी महत्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करत केलेली विकास कामे आणि प्रतिस्पर्धी पक्षाच्यावतीने सक्षम उमेदवार दिले नसल्याने तसेच अळवणी यांच्यासाठी या मतदार संघात कडवे आव्हान नाही. तरीही मताधिक्य वाढवण्याच्यादृष्टीकोनातून अळवणी घरोघरी फिरत प्रचार करत असल्याने विलेपार्र्लेकर त्यांच्या झोळीत किती मतांचे दान घालतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

विलेपार्ले मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. पराग अळवणी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार जयंती सिरोया, मनसेच्या जुईली शेंडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे सुंदरराव पदमुख हे प्रमुख चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. विलेपार्ले येथील काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे अळवणी यांच्याविरोधात सक्षम आणि मजबूत उमेदवार उरला नव्हता. काँग्रेसचे माजी नगरसेवक जयंती सिरोया यांना उमेदवारी दिली आहे. परंतु त्यातुलनेत मनसेच्या जुईली शेंडकर आणि अळवणी यांच्यातच प्रमुख लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

विलेपार्ले भागात वाहतूक कोंडी आणि अनधिकृत वाहनतळ ही प्रमुख समस्या आहे. तसेच अनेक आरक्षित भूखंडांच्या प्रमुख समस्या आहेत. विमानतळ फनेल झोनबाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण व नियमावलीत समावेश करण्याचा प्रयत्न अळवणी यांनी केला. विशेष म्हणजे अंमली पदार्थ विक्रेते व अन्य समाज कंटकावर कारवाई करण्यात महत्वाची भूमिका बजावून विलेपार्लेकरांची सुटका केली. या भागातील अनेक सोसायटींना महानगर गॅसची जोडणी नसल्यामुळे यासाठी पाठपुरावा करत गॅस कंपनीची जोडणी मिळवून दिली.आपण पाच वर्षांमध्ये काय केले याचा लेखाजोखाच अळवणी यांनी कार्यअहवालाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवून पुढील पाच वर्षांमध्ये काय करणार आहोत याचेही आश्वासन दिले आहे. उमेदवार पराग अळवणी यांनी आपल्या कार्यअहवालाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना, आपण पाच वर्षांमध्ये २८ हजार नागरिकांनी कार्यालयात येवून आपले प्रश्न मांडल्याचे सांगितले.

मी पाच वर्षांमध्ये पूर्ण क्षमतेने काम केलेले आहे. कोणत्याही कारणाने कुठलेच माझ्या अखत्यारितील काम कधीच टाळले नाही. जर कधी काळी नेमके कशा पध्दतीने सामोरे आलेले काम पूर्ण करायचे हे कळत नसेल तर योग्य मार्गदर्शन घेउुन त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांनी दिलेल्या वेळेमुळेच मतदार संघात सातत्याने लोकाभिमुख काम करू शकलो आणि या संपर्कातून मिळणार्‍या माहितीच्या आधारावरच विधानसभेत प्रश्न मांडू शकलो. एवढेच नव्हे त काही लोकोपयोगी निर्णय शासनाकडून करून घेउु शकलो,असेही त्यांनी आपल्या कार्यअहवालातून जनतेशी संवाद साधत स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -