घरमुंबईवडाळ्याचा ३० वर्षांचा निष्क्रियतेचा इतिहास पुसून काढा

वडाळ्याचा ३० वर्षांचा निष्क्रियतेचा इतिहास पुसून काढा

Subscribe

प्रसिद्ध शायर, काँग्रेसचे नेते इमरान प्रतापगढी यांचे आवाहन

वडाळ्याचा ३० वर्षांचा इतिहास हा निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराचा असून तो पुसून टाकून युवा उमेदवार शिवप्रसाद लाड यांना भरघोस मतांनी निवडून द्या. ते या मतदारसंघाचा निश्चितच कायापालट करतील, असा मला ठाम विश्वास आहे, असे आवाहन प्रसिद्ध शायर आणि काँग्रेसचे नेते इमरान प्रतापगढी यांनी केले. शिवडी येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील पटांगणात काँगेसने आयोजित केलेल्या प्रचारसभेत प्रतापगढी बोलत होते.

या प्रचारसभेत प्रतापगढी यांनी केंद्र सरकारच्या फसव्या आणि चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका केली. वडाळा विधानसभेसाठी काँग्रेसने शिवकुमार लाड यांच्या रूपाने तरुण, तडफदार अशा नव्या दमाच्या उमेदवाराची निवड केली आहे. शिवकुमार यांचा स्वभाव हा लढाऊ बाण्याचा असून ते या मतदारसंघातील समस्यांसाठी लढणारे वाघ आहेत, असे सांगून प्रतापगढी यांनी एक शेर पेश केला.

- Advertisement -

दायरे में सिमट के आया है,
हर रिवायत से हट के आया है !
आंधियों को जरा ख़बर कर दो,
शेर वापस पलट के आया है !!

त्यांच्या या शेरला उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा गडगडाट करुन प्रतिसाद दिला.  प्रतापगढी यांच्या या सभेला राजकीय विरोधकांनी विरोध दर्शविला होता, परवानगी नाकारण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र विरोधाची पर्वा न करता ही सभा घेण्यात आली. या सभेला किडवाई नगरमधील हजारो रहिवाशी उपस्थित होते, याचा उल्लेख करून प्रतापगढी यांनी एक शेर सादर केला.

- Advertisement -

कुछ इस तरह से ख़ुदा ने मुझे बुलंद किया, मैं थक गया तो हवा ने मुझे बुलंद किया ! मेरी मजाल के मैं आसमाँ को छू लेता, न जाने किसकी दुआ ने मुझे बुलंद किया !!

मागील ३० वर्षांपासून वडाळा मतदारसंघातील समस्या आजही प्रलंबित आहेत. या मतदारसंघाचा कायापालट घडविण्याची धमक फक्त शिवकुमार यांच्यामध्येच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कार्यकर्ता बनून या राजकीय लढ्यात सामील होण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता… एक पत्थर तो तबियतसे उछालो यारों.. हा कवी दुष्यंतकुमार यांचा शेर सादर करुन प्रतापगढी यांनी सभेचा समारोप केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -