घरमहाराष्ट्रपुरावेळी राज ठाकरे कुठे होते? चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

पुरावेळी राज ठाकरे कुठे होते? चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

'कोल्हापुरात पूर आला तेव्हा मी तिथं पाय रोवून उभा होतो. अनेक लोकांचं स्थलांतर केलं. मात्र, राज ठाकरे त्यावेळी कुठे होते,' असा सवाल महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याच्या कसबा पेठेत घेतलेल्या जाहीर प्रचार सभेत चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. पुरावेळी राज ठाकरे कुठे होते? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना विचारला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘कोल्हापुरात पूर आला तेव्हा मी तिथं पाय रोवून उभा होतो. तब्बल ५ लाख लोकांचं स्थलांतर केलं. राज ठाकरे त्यावेळी कुठे होते,’ असा सवाल महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपाच्या संकल्पचित्र प्रदर्शनाच्या दरम्यान पाटील बोलत होते. ‘राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इशाऱ्यावर काम करतात,’ असा चिमटा देखील पाटील यांनी यावेळी काढला आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंनी पुण्यात घेतलेल्या जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती. ‘कोल्हापूर, सांगलीत पूर आला आणि तिथला सरकारमधील एक मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला’, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. तसंच, पाटलांचा उल्लेख ‘चंपा’ असा गर्दीतून झाल्यानंतर या चंपाची चंपी मनसेचा येथला उमेदवार करेल, असंही राज म्हणाले होते. याच टीकेला प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांनी दिलंय.


हेही वाचा – पवारांच्या व्हिडिओची दखल घेणाऱ्या मोदींना नोबेल पुरस्काराचा विसर?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -