घरमहाराष्ट्रपाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार देणार

पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार देणार

Subscribe

शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केल्यानंतर मंगळवारी वांद्र्यातील रंगशारदा येथे भारतीय जनता पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे संकल्प पत्र प्रकाशित करत केले. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. जाहीरनाम्याच्या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात भाजपच्या कॅम्पेन गीताने करण्यात आली. गाण्याला अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले आहे. तर गीत गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे.

प्रकाशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकते यांचा भाजप प्रवेश कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संकल्प पत्र जाहीर करण्यात आले. मागील पाच वर्षात कुठलाही संघर्ष न होता अनेक विषय मार्गी लागले. पाच वर्षांत कुठेही दंगा नाही किंवा गोळीबार झाला नाही. उत्तम प्रशासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र्र हा आमचा मोठा संकल्प आहे. शेतकर्‍यांना समृद्ध करणे हा आमचा संकल्प आहे. इंदू मिलचे स्मारक, शिव स्मारक या सर्व गोष्टी आम्ही पुढच्या पाच वर्षात करू,असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

भाजपच्या संकल्पपत्रातील सोळा घोषणा

मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी देणार

– शेतीला संपूर्ण सोलारच्यामार्फत १२ तास वीज पुरवणार

- Advertisement -

– १ कोटी लोकांना रोजगार देणार

– एक कोटी महिलांना बचत गटाशी जोडून रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करणार

– प्रत्येक बेघराला २०२२ पर्यंत घर आणि प्रत्येकाला पिण्याचे पाणी देणार

– पायाभूत सुविधांमध्ये केंद्राच्या मदतीने ५ लाख कोटींची गुंतवणूक करणार

– राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार

– मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्व वस्त्या बारमाही रस्त्यांनी जोडणार त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा दुसरा टप्पा ३० हजार किमी लांबीचा ग्रामीण रस्ता बनवणार आणि शेतकर्‍यांच्या शेतात जाणार रस्ता पाणंद रस्ते, म्हणून मजबूत करणार

– भारत नेट आणि महानेटच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात इंटरनेट जोडणार

– आरोग्य सर्वांसाठी, सर्वांच्या आवाक्यातील, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जनारोग्य योजना यांची व्याप्ती वाढून पैशाअभावी कोणीही वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करणार

– शिक्षण हे काल सुसंगत अधिक मूल्याधीष्टित करणार, राष्ट्रीय व संवैधानिक मूल्याचे शिक्षण देणार

– सर्व प्रकारच्या कामगारांना नोंदीत करून सामाजिक सुरक्षेच्या परिघात आणणार

– राज्यातील सर्व शहीद जवान, माजी सैनिक, कर्तव्यपालन करताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांचे कुटुंबीय यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कार्यक्रम राबवणार

– राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनासाठी धडक मोहीम राबवून पुनर्वसनाचा काम लवकर पूर्ण करणार

– महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वातंत्रवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार.

जाहिरनामा म्हणजे अपयशाचा कबुलीनामा-जयंत पाटील

भाजपने आज प्रसिद्ध केलेला त्यांचा जाहीरनामा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून गेल्या पाच वर्षातील त्यांच्या संपूर्ण अपयशाचा ‘कबुलीनामा’ आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. या जाहीरनाम्यात सुरुवातीलाच भाजपने कलम ३७० चा उल्लेख केलेला आहे. एकंदरच काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील निवडणुका जिंकण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न कायम आहे. कलम ३७० ऐवजी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भविष्यासाठी हा पक्ष काय करणार आहे याचे उत्तर या जाहीरनाम्यातून मिळाले असते. तर राज्यातील जनतेने किमान हा जाहीरनामा वाचला तरी असता, अशी जोरदार टिकाही जयंत पाटील यांनी केली आहे.भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान आपलाच प्रसिद्ध केलेला २०१४ चा जाहीरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने ही २०१४ सालीच दिलेली आहेत. ही आश्वासने पूर्ण का झाली नाहीत. याचेही उत्तर याच जाहीरनाम्यात भाजपने देणे अपेक्षित होते, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -