हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. मंत्र केवळ साधकाला देवासोबतच नाही तर स्वतःसोबतच देखील एकरुप करतात. वैज्ञानिकदृष्टीकोनातून देखील मंत्रांचा जप करण्याचे अनेक फायदे सांगितले जातात.
कितीही कष्ट केले कितीही पैसा कमावला तरीही अनेकांना आयुष्यात पैशांसंबंधीत समस्येचा सामना करवा लागतो. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी काही मंत्रांचे पठण करणं फायदेशीर ठरु शकतं. जेणेकरुन तुमच्या हातात पैसा शिल्लक राहील आणि आर्थिक तंगी दूर होईल.
आर्थिक तंगी दूर करण्यासाठी मंत्र
- लक्ष्मी मंत्र
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नम:।
- लक्ष्मी गायत्री मंत्र
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॥
- कुबेर मंत्र
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
- लक्ष्मी बीज मंत्र
ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नम:
- लक्ष्मी महामंत्र
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:
हेही वाचा :