ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा शरीराच्या विविध भागांवर प्रभाव असतो. ज्याप्रकारे सू्र्य व्यक्तीच्या बुद्धीशी आणि डोक्याशी संबंधीत असतो त्याचप्रमाणे मंगळ ग्रह व्यक्तीच्या डोळ्यांचा कारक ग्रह मानला जातो. कुंडलीतील ग्रहांच्या शुभ-अशुभ स्थितीनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.
ज्योतिष शास्त्रात, चंद्र ग्रहाला देखील मानाचे स्थान प्राप्त आहे. चंद्र ग्रहाला ज्योतिष शास्त्रात मनाचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र ग्रह शुभ स्थितीत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात नेहमी मानसिक शांती मिळते. तसेच अशा व्यक्तींना आपल्या आईचे देखील सहकार्य मिळते. चंद्र शुभ स्थितीत असल्यास व्यक्ती आयुष्यामध्ये खूप यश मिळवतो.
चंद्राचा अशुभ प्रभाव
कुंडलीमध्ये चंद्र अशुभ किंवा कमजोर स्थितीत असल्यास व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो तसेच त्याला धनहानीची समस्या सतावते. चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे अनेकांना आरोग्यासंबंधित समस्या देखील उद्भवतात. अशा वेळी तुम्ही चंद्र ग्रह मजबूत करण्यासाठी काही उपाय करु शकता.
चंद्र ग्रह मजबूत करण्यासाठी उपाय
- ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत चंद्र ग्रह कमजोर असल्यास प्रत्येक सोमवारी उपवास करावा आणि शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल आणि दूधाने अभिषेक करावा.
- शास्त्रानुसार, कुंडलीतील चंद्राची स्थिती शुभ होण्यासाठी सोमवारी पांढर्या वस्तूंचे म्हणजेच दूध, साखर, दही, पांढरी फुले, पांढरे वस्त्र, पांढरी मिठाई दान करणे शुभ मानले जाते.
- दररोज ‘ॐ भूर्भुव: स्व: अमृतांगाय विदमहे कलारूपाय धीमहि तन्नो सोम: प्रचोदयात्’ या चंद्र गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा.
- दररोज आईच्या पाया पडावे यामुळे देखील चंद्र शुभ फळ देतो.
- चांदीचे दागिने घातल्याने देखील चंद्र ग्रह मजबूत होतो.
- प्रत्येक पौर्णिमेला चंद्राला दूधाचे अर्घ्य द्यावे.
हेही वाचा :