घरभक्तीAngarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीनिमित्त करा 'हे' उपाय; गणपती बाप्पा सर्व विघ्न...

Angarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीनिमित्त करा ‘हे’ उपाय; गणपती बाप्पा सर्व विघ्न करेल दूर

Subscribe

प्रत्येक महिन्यात दोनवेळा श्री गणेशाच्या चतुर्थीचा योग येतो. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी असे म्हणतो तर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. (Angarki Sankashti Chaturthi 2021) या प्रत्येक चतुर्थीनिमित्त भक्तगण व्रत करत असतात. अशात पुढील श्री गणेश चतुर्थी खूप खास आहे कारण मंगळवार हा चतुर्थीचा दिवस आलाय.

गणपती बाप्पा आपल्या भक्ताचे संकट नेहमी दूर करतो. मात्र अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री गणेशाकडे मागितलेली इच्छा पूर्ण होती अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारकी चतुर्थी कर्ज मुक्तासाठी हा चांगला दिवस असल्याचे मानले जाते.

- Advertisement -

मात्र अंगारकी चतुर्थीनिमित्त तुम्ही काही खास उपाय करत कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग काढू शकता. गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने आपली सकारात्मक शक्ती, मानसिक ताकद कायम ठेवा. ज्याआधारे तुम्ही प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ शकता. आचार्य इंदु प्रकाश यांनी घरातील विघ्न दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

१) घरातील विघ्न, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही दररोज श्री गणेशाचे विधीवत पूजा करत
‘वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा’ या मंत्राचा ११ वेळा जप करा.

- Advertisement -

२) स्वत:ला एक लोहपुरुष बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर यादरम्यान तुम्ही हनुमानाच्या मंदिरात गुळाचे दान करा, तसेच भगवान हनुमानाच्या चरणावर माथा टेकवत टीका लावा.

३) जर तुम्ही आपल्या सहकार्याचे किंवा जीवसाथीचे कार्यक्षेत्र वाढवू इच्छिता तर तुम्ही गणपती बाप्पाची रोज मनोभावे पुजा केली पाहिजे.

४) जर तुम्ही बिझनेससाठी कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज ठरवून पण देऊ शकत नाही अशावेळी चिंतेत न राहता, ऋणमोचकमंगल स्तोत्राचे पठण करा. यातून तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल.

४) जर तुमच्या प्रगतीमध्ये बाधा आली. किंवा शिक्षण अपूर्ण राहिलेय. तर अशावेळी केळाच्या पानावर मुठभर मसूर डाळ घ्या आणि ती हनुमानला अर्पण करा,

५) जर तुम्ही जीवनात प्रसिद्ध व्यक्ती होऊ इच्छिता तर अशावेळी आपल्या घराच्या छतावर लाल रंगाचा एक पताका लावा.

६) तुमच्या मुलाला नजर लागली असे वाटत असेल तर लाल मिरची आणि मिठ, मोहरीने मुलांची नजर काढा.

आयुष्यातील अनेक समस्या दूर करून तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा आजचा दिवस खूप खास आहे. त्यामुळे तुम्हीही याप्रकारे गणपती बाप्पाची आराधना करत प्रसन्न करा.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -