Astrology Tips : घरातील ‘या’ ५ गोष्टींवर ठेवा लक्ष, देवी लक्ष्मी करेल धन-धान्याचा वर्षाव

Astrology Tips vastu shastra there is the arrival of ma lakshmi in your house this five thing take care of
Astrology Tips : घरातील 'या' ५ गोष्टींवर ठेवा लक्ष, देवी लक्ष्मी करेल धन-धान्याचा वर्षाव

हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवता मानली जाते. तिच्या कृपेनेच व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येते. ज्यांच्यावर लक्ष्मीमाता कृपा करते त्यांच्या आयुष्यातील सर्व दु:ख, चिंता दूर होते. त्यांच्याकडे धन, संपत्ती, धान्याची कधीच कमतरता येत नाही. त्यामुळे अनेक जण आपल्या जीवनात सुख-समृद्धी यावी यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. वास्तुशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीला प्रसन्न करत तिच्या आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहावा यासाठी घरातील काही ५ गोष्टींवर ठेवा लक्ष ठेवणं अधिक महत्वाचे आहे. यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होईल आणि तुमच्यावर धन-धान्याचा वर्षाव होईल.

शास्त्र आणि पौराणिक मान्यतेनुसार, घरात लक्ष्मीमातेचा वास सदैव राहण्यासाठी घरातील साफ-सफाईवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे. देवी लक्ष्मीला स्वच्छता आणि व्यवस्थित घर आवडते अशा घरांमध्ये लक्ष्मी वास करते. यात घरातील मुख्य प्रवेशद्वारावरील साफ सफाईवर विशेष लक्ष ठेवा.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चप्पल, बूट काढणे चांगलं मानलं जात नाही. यामुळे वास्तुदोष निर्माण होतात याशिवाय घरावर लक्ष्मी नाराज होते.

काही लोकांना सवय असते की, काही लोक घरातील खरकटी भांडी, रात्रीच्या जेवणाची भांडी अशीच ठेवतात आणि सकाळी घासतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार, असं करणं चुकीचे आहे. यामुळे घरात नकारात्मता निर्माण होते तसेच देवा लक्ष्मी रुष्ठ होते. यामुळे खरकटी भांडी तेव्हाच घासणं योग्य असते.

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा कुबेर देवता आणि संपत्तीची देवता लक्ष्मीची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेच्या साफ-सफाईवर योग्य लक्ष द्या. घरातील बिनकामाच्या वस्तू या दिशेला ठेवू नका. घरातील ही दिशा नेहमी मोकळी ठेवा यामुळे घरात धन, संपत्तीची भरभराट होईल.

हिंदू धर्मात झा़डूला लक्ष्मी देवीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे झाडू ठेवण्यावरही विशेष लक्ष ठेवा. शास्त्रानुसार, झाडू नेहमी अशा दिशेला ठेवा जिथे कोणाचाही नजर पडू शकत नाही. यामुळे संपत्तीचे नुकसान होत नाही. याशिवाय संध्याकाळी घरात झाडू मारु नका, असे केल्यास घरात दारिद्र येण्याची शक्यता असते.