प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षट्तिला एकादशी म्हटले जाते. आज(18 जानेवारी) रोजी षट्तिला एकादशीचे व्रत केले जाईल. षट्तिला एकादशी चे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. तसेच या दिवशी जो व्यक्ती श्री विष्णूंना तीळ अर्पण करतो. त्या व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. तसेच या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
षट्तिला एकादशी मुहूर्त
एकादशी प्रारंभ : 17 जानेवारी, मंगळवार, संध्याकाळी 6:05 पासून
एकादशी समाप्त: 18 जानेवारी, बुधवार, संध्याकाळी 4:03 पर्यंत
षट्तिला एकादशीची अशा प्रकारे करा पूजा
- षट्तिला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
- घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
- पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
- भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.
षट्तिला एकादशीला करु नका ‘या’ चूका
एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते.अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा.
- भात खाऊ नका
शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की, जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते. त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आर्शिवाद मिळत नाही. एकादशीच्या भात खाणं पाप मानले जाते. - मीठाचे सेवन करू नका
शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये, अधवा कमी प्रमाणात खावे. - मांसाहार करू नका
शास्त्रानुसार, एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानले जाते, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा. - या गोष्टींचे सेवन करू नका
एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ, वांगे, मूळा, कांदा , लसूण यांचे सेवन करणे टाळावे.