Sunday, December 3, 2023
घरमानिनीReligious15 नोव्हेंबरला साजरी करा भाऊबीज; वाचा शुभ मुहूर्त आणि तिथी

15 नोव्हेंबरला साजरी करा भाऊबीज; वाचा शुभ मुहूर्त आणि तिथी

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. या वर्षी भाऊबीज बुधवार,15 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. ज्यादिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते आणि आरती ओवाळते. तसेच त्याचा दिर्घायुष्याची प्रार्थना करते. दिवाळीनंतर भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

भाऊबीज शुभ मुहूर्त आणि तिथी

हिंदू पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. यंदा भाऊबीज 15 नोव्हेंबर रोजी असणार आहे. भाऊबीज तिथी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजून 36 मिनिटांपासून सुरु असून 15 नोव्हेंबर रोजी 1 वाजून 47 मिनिटांपर्यंत असेल. 15 नोव्हेंबर रोजी राहू काळ सोडल्यास कोणत्याही वेळी तुम्ही भाऊबीज साजरी करु शकता.

- Advertisement -

असे करा भाऊबीज

How Bhai Dooj is Celebrated in Different States of India - Blog

  • धार्मिक मान्यतेनुसार, भाऊबीजच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • घरातील देवी-देवतांचा आर्शिवाद घ्यावा. आई-वडिलांचा आर्शिवाद घ्यावा.
  • शुभ मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावाचे औक्षण करावे. त्यावेळी पूजेच्या ताटामध्ये कुंकू, अक्षता, चंदन आणि धूप-दीप, मिठाई ठेवावी.
  • भावाला टिळक लावताना “भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भक्तमिमं शुभं, प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषतः” हा मंत्र वाचावा आणि भावाच्या दिर्घायुष्यासाठी कामना करावी.

हेही वाचा :

Diwali 2023 : पाडव्याला राशीनुसार बायकोला द्या ‘ही’ भेट वस्तू

- Advertisment -

Manini