Chanakya Niti : चाणक्यांच्या मते, अशा कुटुंबामध्ये कधीही जाणवत नाही पैशांच्या कमतरता

चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत. आयुष्यात या गोष्टींचा वापर केल्यास आयुष्यातील अनेक संकटांवर मात होऊ शकते.

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात धनवान होण्याची अपार इच्छा असते. यासाठी लोक खूप मेहनत देखील करतात. चाणक्य नीतीनुसार अफाट धन-संपत्तीचे मालक व्हायचे असेल तर खूप मेहनतीबरोबरच, बुद्धिमत्ता आणि व्यक्तीचे कर्म सुद्धा चांगले असायला हवे. जेव्हा व्यक्तीचे कर्म चांगले असतात तेव्हा त्याव्यक्तीवर देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात देवी लक्ष्मी कोणत्या व्यक्तींवर आपला कृपा दाखवते याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

या कुटुंबामध्ये कधीही जाणवत नाही पैशांच्या कमतरता

  • चाणक्य नीतीनुसार ज्या लोकांवर भगवान विष्णूंचा आर्शिवाद असतो. अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मी सुद्धा नेहमी प्रसन्न असतात. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांना दररोज चंदन अर्पित करा.
  • देवी लक्ष्मींचा आर्शिवाद प्राप्त करायचा असेल तर, घरातील महिलांचा , वडिलधाऱ्या व्यक्तींता सन्मान करा.
  • गरजू आणि गरिबांना दानधर्म करा. अशामुळे तुमच्या धन संपत्तीत वाढ होईल.
  • देवाची भक्ती करणाऱ्या व्यक्तीमध्ये नेहमी सकारात्मत ऊर्जा असते. असे लोक आयुष्यातील अनेक संकटांवर माक करतात. त्यामुळे ते नेहमी सफल आयुष्य जगतात.
  • ज्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातवरण असते. त्या घरात कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही.
  • जे घर नेहमी स्वच्छ असते. अशा घरात माता लक्ष्मी सदैव वास करतात.
  • ज्या घरामध्ये सकाळ-संध्याकाळ पूजा, श्र्लोक, मंत्र , जप केला जातो तिथे देवी-देवतांचा वास असतो.

 


हेही वाचा :Chankaya Niti : चाणक्यांच्या मते ‘या’ प्रकारच्या स्त्रिया असतात कुटुंबासाठी आदर्श