यशस्वी होण्यासाठी गाढवाकडून शिका ‘या’ तीन गोष्टी

माणसाप्रमाणे प्राण्यांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. पण त्या गोष्टी आपण कधी गांभीर्याने घेत नाही.

chanakya niti donkey teach three things to get success in life

शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. माणूस जन्मापासून ते मरेपर्यंत काही ना काही गोष्टी शिकत असतो. यात घरातील वडीलधारी मंडळी, गुरु, मित्र अनेक जण आपल्याला पायरी पायरी योग्य मार्ग दाखवत असतात. हीच माणसं आपल्याला जीवन जगण्याचे धडे देतात. मात्र माणसाप्रमाणे प्राण्यांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. पण त्या गोष्टी आपण कधी गांभीर्याने घेत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, या असा एकही प्राणी नाही ज्याला पृथ्वीवर देवाने कोणत्याही गुणांशिवाय देवाने पाठवले आहे. दरम्यान गाढव या प्राण्याकडून माणसाला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. गाढवाकडून काय शिकलं पाहिजे हे चाणक्याने श्लोकातून सांगितले आहे. जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर गाढवाचे हे 3 गुण अवश्य अंगीकारले पाहिजेत.

श्लोक

सुश्रान्तोपपि वाहेद् भरम् शीतोस्नाम न पश्यति ।

सन्तुष्टश्चरतो नित्यं त्रिनि शिक्षाश्च गर्द्भट

१) जे मिळाले त्यात समाधानी असणे

जे मिळाले ते त्यात समाधानी असणे हा आनंदी जीवन जगण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे. त्याचा लवकर अंगीकार करणे माणसाच्या दृष्टीने चांगले आहे. जे आहे त्यात समाधानी असले पाहिजे. हव्यासापोटी शर्यतीतील घोड्याप्रमाणे पळू नका. कोणत्याही गोष्टीचा लोभ जास्त ठेवू नको, असे केल्याने तुम्हाला नेहमी त्रास होईल आणि आनंद कधीच तुमच्या वाटेला येणार नाही.

२) आळशीपणा न करणे

जर एखाद्या व्यक्तीला हुशार बनायचे असेल आणि प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्याही कामात कधीही आळशीपणा करु नका. ज्याप्रमाणे गाढव थकूनही ओझे वाहून नेत राहतो त्याचप्रमाणे माणसाने आपले काम तन्मयतेने पूर्ण केले पाहिजे .आळशीपणामुळे माणूस काम टाळतो आणि ते कधीच पूर्ण करू शकत नाही.

३) परिस्थितीशी जुळवून घेणे

गाढवाला थंडी वा गरमी कशाची पर्वा नसते. परिस्थितीनुसार तो स्वत:ला जुळवून घेत जोरदार काम करतो. तसेच परिस्थितीप्रमाणे कारण सांगून कोणतेही काम उद्यासाठी सोडणे योग्य नाही. स्पर्धेच्या या युगात हे करणे म्हणजे चांगली संधी गमावण्यासारखे आहे. याने फक्त तुमचे नुकसान होईल. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जो माणूस प्रत्येक पावलावर संकटांचा सामना करण्यास तयार असतो, यश त्याच्या पायाशी लोळण घेते.


Vastu Tips : श्रीमंत व्हायचंय? मग घरामध्ये आजच लावा या 7 धावत्या घोड्यांचा फोटो; अन् पहा चमत्कार