घरभक्तीचाणक्य नीती : लग्न करण्यापूर्वी मुलीमध्ये पाहा 'या' खास गोष्टी! नाहीतर आयुष्यभर...

चाणक्य नीती : लग्न करण्यापूर्वी मुलीमध्ये पाहा ‘या’ खास गोष्टी! नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

Subscribe

लग्न हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक सुंदर स्वप्न असते. ज्यामध्ये ती एक व्यक्ती आयुष्यभर आपल्या सुख- दुःखात आपल्याला साथ देऊ शकेल. तुमच्यावर प्रेम करेल, तुमच्या छोट्या-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देईल

चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत. आयुष्यात या गोष्टींचा वापर केल्यास आयुष्यातील अनेक समस्यांचे निवारण होऊ शकते.

चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये विवाहापूर्वी मुलीमध्ये कोणते गुण पाहायला हवे याबाबत काही तर्क सांगितले आहेत. याचं कारण म्हणजे लग्न हे आयुष्यभराचे बंधन असते. एकदा ते जोडले की त्या दोन व्यक्तींसोबतच दोन कुटुंबही आयुष्यभरासाठी जोडले जातात. मात्र विवाहापूर्वी लग्नासाठी पसंत करत असणाऱ्या मुलीमध्ये असे काही गुण आहेत का हे पाहायला हवे, ज्यामुळे पुढील आयुष्यात तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

- Advertisement -

खरंतर, लग्न हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक सुंदर स्वप्न असते. ज्यामध्ये ती एक व्यक्ती आयुष्यभर आपल्या सुख- दुःखात आपल्याला साथ देऊ शकेल. तुमच्यावर प्रेम करेल, तुमच्या छोट्या-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देईल.

लग्नापूर्वी चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात घ्या

- Advertisement -
  • मुलीचे गुण पाहा
    जीवनसाथीची निवड करण्यापूर्वी त्या व्यक्तीचे बाहेरील सौंदर्य पाहण्यापेक्षा तिच्या आतंरिक गुणांकडे लक्ष द्या. चेहऱ्यावरील सौदर्यापेक्षा ती व्यक्ती मनाने किती सुंदर आहे हे पाहा.
  • सौंदर्याच्या मागे लागू नका
    अनेक मुलांची अपेक्षा असते, की त्यांची जीवनसंगीनी दिसायला सुंदर असावी, मात्र फक्त सुंदर दिसण्यापेक्षा त्या व्यक्तीमध्ये गुण किती चांगले आहेत, शिवाय ती आपल्याला आपल्या संकट काळात किती साध देऊ शकेल याचा ही विचार करावा.
  • धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवणारी असावी
    जीवनसाथीची निवड करण्यापूर्वी ती व्यक्ती धर्माला आणि कर्माला किती महत्त्व देते हे पाहावे. कारण धर्म आणि कर्मावर मनुष्य जीवन आधारित आहे.
  • स्वभाव रागीट नसावा
    राग हा माणसाचा शत्रू असतो. रागाने अनेक गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळे जीवनसाथीची निवड करण्यापूर्वी ही गोष्ट नक्की बघावी.
  • स्वभाव प्रेमळ असावा
    स्वभावाने प्रेमळ व्यक्ती सर्वांनाच प्रिय असतात. अशा मुली सर्वांची काळजी सुद्धा घेतात. कोणाचेही मन दुखावत नाहीत.

 


हेही वाचा :http://व्यवसायामध्ये यश हवंय…? मग चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ 5 चमत्कारी मंत्राचे पालन करा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -