प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की, त्यांची मुलं संस्कारी असावी. त्यांच्यातील गुणांनी त्यांनी आई-वडिलांचं तसेच कुळाचं नाव मोठ्ठ करावं. मुलं आई-वडिलांचा भविष्यातला आधार असतात. त्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच योग्य संस्कार करण्याची जबाबदारीसुद्धा आई-वडिलांचीच असते. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टींचा अवलंब पालकांनी केल्यास त्यांची मुलं एक चांगला माणूस बनण्यास पात्र ठरतील.
- मुलांना आज्ञाधारक बनवा
मुलांसमोर आई-वडिलांनी नेहमी उच्च आणि चांगले आचरण ठेवून वागायला हवे, तेव्हाचं मुलं आज्ञाधारक बनतात. ज्या आई-वडिलांची मुलं आज्ञाधारक असतात ते खूप भाग्यशाली असतात. - मुलांना खोटं बोलण्यापासून रोखा
मुलांना कधीच खोट बोलण्याची सवय असू नये, जर मुलं खोटं बोलत असतील तर त्यांना वेळीस रोखावे, त्यामुळे त्यांना खरं बोलण्याचं महत्त्व समजावून सांगावं.
- Advertisement -
- मुलांना योग्य शिक्षण द्या
आई-वडिलांनी मुलांना योग्य शिक्षण द्यायला हवे, तसेच शिक्षणाबरोबरच मुलांमधील कला-गुणांनासुद्धा वाव द्यायला हवा. - धर्माबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण करा
मुलांना त्यांच्या धर्माबद्दल शिकवण द्यायला हवी, पौराणिक कथा सांगायला हव्या. ग्रंथ, श्लोक यांचे धडे द्यायला हवे. - मुलांना कष्टाचं आणि पैशांचं महत्त्व सांगा
आई-वडिलांनी मुलांना कष्टाचं तसेच कष्ट करणाऱ्या व्यक्तींचा आदर करायचे संस्कार द्यायला हवेत. तसेच मुलांना पैशांचे महत्त्व सांगायला हवे. पैशांचा योग्य वापर कुठे आणि कसा करावा या गोष्टीसुद्धा सांगायला हव्यात.
- निसर्गाचे महत्त्व
आई-वडिलांनी मुलांना निसर्गाचे महत्त्व सांगायला हवे, निसर्गातील झाडे , पाने , फुले आणि इतर सजीवांची काळजी घ्यायला शिकवावे. तसेच निसर्गातील सजीवांवर अत्याचार करण्यापासून रोखावे. - सगळ्यांचा आदर करायला शिकवा
आई-वडिलांनी मुलांमध्ये सगळ्यांचा आदर करायचे संस्कार द्यावे, सगळ्यांचा आदर करणारी मुलं नेहमीचं कौतुकास पात्र ठरतात. - महापुरूषांचे धडे द्या
आई-वडिलांनी मुलांना जगातील, देशातील महापुरुषांचे योग्य धडे द्यावे. महापुरुषांच्या त्यागाची, पराक्रमाची शिकवण द्यावी.
- Advertisement -
हेही वाचा :