चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत.
आचार्यांच्या या नीतीशास्त्राला ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये मानवी जीवनाच्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. जर प्रत्येक व्यक्तीने जीवनात या गोष्टींचा अवलंब केला तर आयुष्यातील अनेक संकटांवर मात करता येईल, शिवाय आयुष्यही सुखकर होईल.
या गोष्टी ठेवाव्या नेहमी गुप्त
- पती-पत्नीमधील गोष्टी
चाणक्य सांगतात की, पती-पत्नींनी कधीही आपल्या वैवाहिक जीवनाच्या गोष्टी इतरांशी बोलू नये. तसेच एकमेकांच्या चुका सुद्धा तिसऱ्या व्यक्ती समोर बोलून दाखवू नये. पती-पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद झाले, तर ते दोघांनी आपापसात मिटवावे जेणेकरून तुमच्या नात्यामध्ये अन्य व्यक्तींमुळे कटुता येणार नाही, शिवाय गैरसमजसुद्धा होणार नाही. यामुळे बाहेरील व्यक्तींसमोर तुमचा मान-सन्माम टिकून राहील.
- तुमच्या कामाची योजना
आचार्य चाणक्य सांगतात की, तुम्ही तुमच्या पूर्वनियोजित कामांच्या गोष्टी कधी कोणाला सांगू नका, यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अपयश मिळू शकतं. त्यामुळे तुमचे कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतरच त्याबद्दल इतरांना सांगावं.
- कुटुंबातील गुप्त गोष्टी
तुमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचे कलह, वाद तुम्ही बाहेरील व्यक्तीला कधीही सांगू नका, यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांचा मान-सन्मान कमी होऊ शकतो.
- एखाद्या ठिकाणी झालेला अपमान
चाणक्यांच्या नीतीशास्त्रानुसार जर एखाद्या ठिकाणी आपला अपमान झाला, तर त्याचा उल्लेख कुठेही करू नये. जेणेकरून तुमची कोणी खिल्ली उडवणार नाही.
हेही वाचा :