Chankaya Niti : चाणक्यांच्या मते ‘या’ प्रकारच्या स्त्रिया असतात कुटुंबासाठी आदर्श

चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत.

आचार्यांच्या या नीतीशास्त्राला ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये मानवी जीवनाच्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. जर प्रत्येक व्यक्तीने जीवनात या गोष्टींचा अवलंब केला तर आयुष्यातील अनेक संकटांवर मात करता येईल, शिवाय आयुष्यही सुखकर होईल.

असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मग ती स्त्री त्या पुरुषाची आई, बहीण, पत्नी, मैत्रीण कोणीही असू शकते. परंतु जर ती स्त्रीच जर गुणाने, स्वभावाने योग्य नसेल तर कुटुंबातील व्यक्तीचे नुकसान देखील होऊ शकते. चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात आदर्श महिलांचे असे काही गुण सांगितले आहेत, ज्यामुळे आपल्या सहज योग्य स्त्रीची पारख करता येईल.

 • शांत चित्त असणारी स्त्री
  चाणक्य नीतीनुसार शांत स्त्रीला लक्ष्मी स्वरूप मानले जाते. घरातील कोणत्याही व्यक्तीचा राग न मानता समजूतदार पणाने वावरणारी स्त्री कुटुंबासाठी आदर्श मानली जाते. अशी स्त्री ज्या कुटुंबामध्ये असते, त्या घरात सुख-समृद्धीचा वास असतो.
 • संस्कारी , गुणवान स्त्री
  चाणक्य नीतीनुसार संस्कारी, गुणवान स्त्री कुटुंबाचे कल्याण करते. अशी स्त्री ज्या घरात असते. तिथे नेहमीच सकारात्मकता असते. संस्कारी स्त्रिया कुटुंबातील सदस्यांसाठी प्रेरणादायी असतात.
 • गोड बोलणारी स्त्री
  चाणक्य नीतीनुसार जी स्त्री नेहमी गोड बोलते अशी स्त्री घरातील व्यक्तींचे, नातेवाईकांचे मन जिंकून घेते. अशी स्त्री कुटुंबातील सर्वांचा आदर करते. असा स्त्रियांमुळे कुटुंबात कलह होत नाही.
 • आयुष्यात मर्यादीत इच्छा बाळगणारी
  चाणक्य नीतीनुसार जी स्त्री आयुष्यात मर्यादीत इच्छा बाळगते ती आयुष्यातील कोणत्याही परिस्थित मात करू शकते.

 


हेही वाचा :Chanakya Niti : चाणक्यांच्या मते समोरच्या व्यक्तीला कसे पारखावे?