Wednesday, April 24, 2024
घरमानिनीReligiousयंदा 5 महिने असणार चातुर्मास; शुभ कार्य करणं मानलं जातं अशुभ

यंदा 5 महिने असणार चातुर्मास; शुभ कार्य करणं मानलं जातं अशुभ

Subscribe

हिंदू धर्मात चातुर्मासाला महत्त्वपूर्ण मानले जाते. चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णूंची पूजा-आराधना करणं अधिक महत्वपूर्ण मानले जाते. चातुर्मास म्हणजे 4 महिने श्री विष्णू योगनिद्रेत जातात. या काळात कोणतेही मांगलिक कार्य, जावळ, गृह प्रवेश यांसारखे कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते. हा चातुर्मास देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून सुरु होतो यावेळी भगवान विष्णू योग निद्रेत जातात. तसेच चार महिन्याचा काळ पूर्ण झाल्यावर देवउठनी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. मात्र, यंदा चातुर्मासाचा काळ 4 महिने नसून 5 महिने असणार आहे.

5 महिने शुभ कार्य करण्यास वर्ज्य

- Advertisement -

चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करणं वर्ज्य मानले जाते. या काळात केवळ पूजा-आराधना करणं अत्यंत शुभ मानले जाते. यंदा चातुर्मासाचा काळ 4 महिने नसून 5 महिने असणार आहे. तसेच श्रावण महिन्यातच अधिकमास लागणार आहे. त्यामुळे यंदा श्रावण महिना देखील 2 महिने असणार आहे. 5 महिने चातुर्मास असल्याने या काळात लग्न, जावळ, घर बांधणी, घर गृहप्रवेश, वाहन खरेदी, नवीन मालमत्ता खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे यासारखी शुभ कार्य या 5 महिन्यांत होणार नाहीत.

‘या’ तारखेला सुरु होणार चातुर्मास

भगवान विष्णु (संरक्षक और रक्षक) - हिंदू भगवान - GoBookMart

- Advertisement -

हिंदू पंचांगानुसार, यंदा चातुर्मास 29 जूनला म्हणजेच आषाढी एकादशीला झाला असून तो 23 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच देवउठनी एकादशीपर्यंत असेल. हा संपूर्ण काळ 5 महिन्यांचा असेल.

 


हेही वाचा :

Nirjala Ekadashi 2023 : निर्जला एकादशीचा पाच पांडवांशी आहे ‘हा’ खास संबंध

- Advertisment -

Manini