दत्त जयंतीचे महत्त्व

विष्णूच्या २४ अवतारांपैकी दत्त हा एक अवतार मानला जातो. देशभरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यातही कर्नाटकातील गुलबर्गाजवळील दत्त मंदीर, कोल्हापूरची नरसिंह वाडी, आंध्र प्रदेशातील पीठापुरम, सौराष्ट्रातील गिरनार येथे या दिवशी मोठा उत्सव असतो.

दत्त जयंतीची आख्यायिका

दत्तात्रयाची माता अनसूया, एक पुरातन शुद्ध आणि सद्गुणी पत्नी होती. तिने, ब्रह्मा, विष्णू आणि शिव,यांचे सामर्थ्य असलेल्या मुलाला जन्म देण्यासाठी कठोर तपस्या केली. यामुळे तिची परिक्षा घेण्यासाठी तीन देवता संन्याश्याच्या वेशात अनसूयासमोर हजर झाले. त्यांनी तिला नग्न भिक्षा देण्यास सांगितले.

त्यानंतर अनुसयेने एक मंत्र उच्चारला. त्यानंतर क्षणात त्या तिघे संन्याशी बाळांमध्ये बदलले. अत्री ऋषी आश्रमात परतले. तेव्हा अनसूयाने झालेली घटना त्यांना सांगितली. त्यानंतर अत्रींनी त्या तीन बाळांना आपल्या हृदयाशी घेतले. आणि त्यांचे एका बालकात रुपांतर झाले.

तिकडे या तिन्ही देवतांच्या पत्नींनी अनसूयेची क्षमा मागितली. तिला त्यांचे पती परत करण्याची विनंती केली. अनसूयाने त्यांची विनंती मान्य केली. त्यानंतर त्रिमूर्ती अत्री आणि अनसूया यांच्या आशिर्वादाने देव मूळ रुपात आले. तेव्हापासून दत्तजयंतीला पुराणात विशेष महत्व प्राप्त झाले.