यंदाही दिवाळी सणानिमित्त देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवसांत लक्ष्मी मातेला पुजण्याची प्रथा आहे. यंदा 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. दिवाळी सणानिमित्त आपण अनेक वस्तू खरेदी करतो. मात्र, शास्त्रात अशा काही वस्तूंचा उल्लेख केला आहे ज्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होता. ज्यामुळे घरातील पैशांची तंगी दूर होण्यास मदत होते.
लक्ष्मीपूजन खरेदी करा ‘या’ वस्तू
- मोरपंख
दिवाळीच्या दिवसांत मोराचे पंख घरी आणणे शुभ मानले जाते. मोराच्या पंखाने घरातील सुख-शांती अधिक वाढते. यासाठी मोर पंख घरातील आपल्या कामाच्या जागीच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावे.
- लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा
दिवाळीनिमित्त लक्ष्मी- कुबेराची प्रतिमा खरेदी करणं शुभ मानलं जातं. या प्रतिमा तुम्ही देवघरात ठेऊ शकता.
- श्रीयंत्र
श्रीयंत्र देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनला ते आवर्जून खरेदी करावे आणि त्याची पूजा करावी.
- धातूचा कासव
वास्तुशास्त्रातही कासवाला महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळीत धातूने कासव घरी आणल्यास सुख-शांती नांदते तर धन प्राप्ती होते.
- मातीचे मडके
दिवाळीत मातीचे मडके खरेदी करु शकता. या मातीच्या मडक्यात पाणी भरुन ते उत्तर दिशेने ठेवावे आहे. असे केल्याने घरातील पैशाची कमी दूर होण्यास मदत होते.
हेही वाचा :