Monday, December 11, 2023
घरमानिनीReligiousDiwali 2023 : देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी करा 'या' गोष्टी

Diwali 2023 : देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी करा ‘या’ गोष्टी

Subscribe

दिवाळी हा हिंदू सणांपैकी एक प्रमुख सण मानला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला दिवाळी सण साजरा केला जातो. यंदा 12 नोव्हेंबर 2023 रोजी देशभरात दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीत लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी रंगाोळी आणि इतर गोष्टी फॉलो करु शकता.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुराणांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातील काही गोष्टी पुढे दिल्या आहेत, ज्यातून लक्ष्मी माता खुश होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

- Advertisement -
  • अंगणात रांगोळी काढा

Happy Diwali Rangoli Stock Photos, Images and Backgrounds for Free Download

 

- Advertisement -

धनाची देवता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या घरातील अंगणात सुंदर रांगोळी काढा. असे म्हटले जाते की, घराची साफ-सफाई करत दारात आकर्षक रांगोळी काढल्यास घरात लक्ष्मीचा वास नेहमी राहतो.

  • दारावर लक्ष्मीची पावले काढा

My Desi Basket | LAXMI PAUL

 

देवी आपल्या घरात यावी यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ देवीच्या पावलांचे ठसे काढावेत. बाजारातही या पावलांच्या आकाराचे छाप सहज मिळतात. याशिवाय शक्य असल्यास काही जण सोन्या-चांदीचे देखील बनवून घेतात. हे ठसे घराच्या आतमध्ये येत असल्याचे दिसले पाहिजे. अस केल्याने तुम्ही देवीला घरी येण्यासाठी निमंत्रण देत आहात असे म्हटले जाते.

  • घराच्या दारावर तोरण लावा

Why do Hindu's tie mango leaves at the doors of a house's entrance? Is  there any scientific reason or just belief? - Quora

दिवाळीच्या दिवसात देवीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य दारावर तोरण लावा. आंब्याची पानं, फुलं आणि भाताच्या दाण्यांपासून तयार केलेलं तोरण अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे पानं, फुलांपासून तयार करण्यात आलेलं तोरण सुंदर दिसते.

 


हेही वाचा : 

Diwali 2023 : सकारात्मकतेसाठी दिवाळीत अशी करा घराची सजावट

- Advertisment -

Manini