हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केली जाते. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते.
दिवाळीच्या दिवशी सकाळी करा ‘हे’ उपाय
- Advertisement -
- देवी लक्ष्मीला साफ-सफाई खूप प्रिय आहे. त्यामुळे दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करा.
- त्यानंतर घरातील देवांची पूजा करा. घराबाहेर सुंदर रांगोळी काढा. घराबाहेर फुलांचे तोरण बांधा.
- मुख्यदार पुसून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढा.
- घरामध्ये सुवासिक अत्तर शिंपडा किंवा गुलाबजल शिंपडा.
- दिवाळीच्या दिवशी स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करा.
- संध्याकाळी पूजा करताना देवी लक्ष्मीची आरती करा आणि देवी लक्ष्मींच्या स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करा. असं म्हणतात की, असं केल्यास देवी लक्ष्मी खूश होतात.
- तसेच या दिवशी घरामध्ये कुठेही अंधार ठेवू नका.
- दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
नरक चतुर्दशी मुहूर्त
अभ्यंग स्नान : 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 05:28 ते 06:41 पर्यंत करावे.
- Advertisement -
दीपदान : 12 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 05:29 ते रात्री 08:07 पर्यंत असेल.
लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त
दिपावली तिथी : रविवार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:44 पासून ते 13 नोव्हेंबर दुपारी 02:56 पर्यंत असेल.
लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त : रविवार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 05:40 पासून 07:36 मिनिटांपर्यंत असेल.
हेही वाचा :