दिवाळी पाडव्याचा दिवस प्रत्येक पती-पत्नीसाठी खूप खास असतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनींकडून पतीला औक्षण केले जाते. तसेच त्यानंतर पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो. यंदा दिवाळी पाडव्याच्या दिवशी बायकोला तिच्या राशीनुसार दिलेली भेट वस्तू तिच्या आणि तुमच्या आयुष्यातही सुख-समृद्धी घेऊन येईल.
राशीनुसार बायकोला द्या भेट वस्तू
- मेष
तुमच्या बायकोची रास जर मेष असेल तर तिला लाल रंगाची भेट वस्तू द्यावी. यामध्ये तुम्ही लाल रंगाचा ड्रेस, लाल साडी किंवा उगवत्या सूर्याचे चित्र द्यावे.
- वृषभ
तुमच्या बायकोची रास वृषभ असल्यास तिला तुम्ही परफ्यूम किंवा मेकअप किट देऊ शकता.
- मिथुन
तुमच्या बायकोची रास मिथुन असल्यास तिला तुम्ही बांबू प्लांट किंवा पैसे देऊ शकता.
- कर्क
तुमच्या बायकोची रास कर्क असल्यास तिला तुम्ही सफेद रंगाचे कपडे किंवा चांदीची कोणतीही भेट वस्तू देऊ शकता.
- सिंह
तुमच्या बायकोची रास सिंह असेल, तर तिला तुम्ही तांबे किंवा पितळेची भेट वस्तू गिफ्ट करावी. यामुळे तिच्या आणि तुमच्या आयुष्यात समुद्धी येईल.
- कन्या
तुमच्या बायकोची रास कन्या असेल, तर तिला हिरव्या रंगाची साडी गिफ्ट द्यावा.
- तुळ
तुमच्या बायकोची रास तुळ असेल, तर तिला तुम्ही सुंदर दागिने भेट देऊ शकता.
- वृश्चिक
तुमच्या बायकोची रास वृश्चिक असेल, तर तिला तुम्ही तांब्यापासून तयार झालेल्या वस्तू गिफ्ट करु शकता. शिवाय तुम्ही लाल रंगाचा ड्रेस, लाल साडी देखील गिफ्ट देऊ शकता.
- धनु
तुमच्या बायकोची रास धनु असेल, तर तिला तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकता. तसेच तुम्ही तिला पितळेची वस्तू देऊल देऊ शकता.
- मकर
तुमच्या बायकोची रास मकर असेल, तर तिला तुम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
- कुंभ
तुमच्या बायकोची रास जर कुंभ असल्यास तिला तुम्ही निळ्या रंगाचे कपडे गिफ्ट देऊ शकता.
- मीन
तुमच्या बायकोची रास मीन असेल, तर तिला तुम्ही केशरी व पिवळ्या रंगाचा ड्रेस गिफ्ट देऊ शकता. तसेच सोन्याचा दागिना देखील देऊ शकता.
हेही वाचा :