हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी असणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर, धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या दिवशी धनाची पूजा करणं शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी काही विशिष्ट गोष्टी खरेदी करण्याचे देखील महत्व आहे. यासोबतच या दिवशी यमदीपदान करणं देखील शुभ मानलं जातं.
असं म्हणतात, या दिवशी यमदीपदान केल्याने अकाली मृत्यू टळतो. त्यामुळे पौराणिक काळापासून या दिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे.
कसे करावे यमदीपदान?
- धनत्रयोदशीला यमराजासाठी दिवा दान केला जातो. यमराजाच्या नावाने दिवा दान केल्याने अकाली मृत्यू होत नाही. यासाठी संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा चार बाजू असलेला दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला लावा आणि त्यात थोडे काळे तीळ टाका.
- हा दिवा लावताना दक्षिणेकडे तोंड करुन आपल्या कुटुंबातील सर्वांसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करा. यावेळी खालील मंत्र 11 वेळा म्हणा.
मृत्युना पाशहस्तेन कालेन भार्यया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात्सूर्यजः प्रीयतामिति ॥
धनत्रयोदशी तिथी
धनत्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:36 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:58 पर्यंत चालेल. धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळात केल्यास देवी लक्ष्मी घरात राहते.
प्रदोष काळ : संध्याकाळी 5.46 ते 8.25 पर्यंत आहे.
दीप दान करण्यासाठी शुभ वेळ – संध्याकाळी 5:46 ते 8:26
हेही वाचा :