दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जात असून या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते. या दिवशी देवीच्या पूजा-आराधनेसोबतच तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो.
- पंचामृत
देवीला पंचामृत अर्पण केले जाते. मध, दही, दूध. तूप आणि साखर या पाच वस्तूंपासून पंचामृत तयार केले जाते. पूजा झाल्यानंतर देवीला प्रसाद म्हणून अपर्ण केले जाते.
- गूळाचा हलवा
रवा, गूळ आणि सुकामेव्यापासून हा हलवा तयार केला जातो. याला आपल्याकडे गूळाचा शिरा असेही म्हणतात.
- खीर
देवीला खीर फार प्रिय आहे. यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला सुकामेवा टाकलेला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य द्यावा.
- बुंदीचे लाडू
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपतीचीही पूजा अर्चा केली जाते. बाप्पाला लाडू आवडत असल्याने या दिवशी लाडवाचा प्रसाद गणेशाला अर्पण करावा. यामुळे माता लक्ष्मीबरोबरच गणपतीचीही कृपादृष्टी तुमच्यावर वर्षभर राहील.
- काजू बर्फी
काजूपासून बनवण्यात आलेली बर्फी देवीला प्रिय आहे.यामुळे देवीला काजू कतलीचा नैवेद्य द्यावा. पूजा झाल्यानंतर हीच मिठाई प्रसाद म्हणून वाटावी.
- मखाना खीर
मखाने कमाळाच्या बियांपासून बनवले जातात. त्यामुळे देवी लक्ष्मीला मखान्याची खीर देखील अत्यंत प्रिय आहे.
- रसगुल्ला
देवी लक्ष्मीला रसगुल्ला देखील खूप आवडतो. याचा देखील नैवेद्य तुम्ही देऊ शकता.
- करंजी
देवी लक्ष्मीला करंजी देखील खूप आवडते. दिवाळीत आपल्या सर्वांच्याच घरी करंजी बनवली जाते. याचा देखील नैवेद्य अवश्य द्यावा.
हेही वाचा :