Monday, December 11, 2023
घरमानिनीReligiousDiwali 2023 : आज वसुबारस; अशी करा गायीची पूजा

Diwali 2023 : आज वसुबारस; अशी करा गायीची पूजा

Subscribe

दिवाळीची खरी सुरुवात वसुबारस पासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. आज(गुरुवार) 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस साजरा केला जाईल. या दिवशी गाईची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानले जाते. असं म्हणतात की, गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. त्यामुळे हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते.

वसुबारस म्हणजे नेमकं काय?

हिंदू पंचांगानुसार, वसुबारस अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केला जातो. या दिवशी घरोघरी गायीची आणि वासराची पूजा केली जाते. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस त्यामुळे वसुबारस असं म्हटलं जातं. हा सण महाराष्ट्रामध्ये तसेच गुजरातमध्ये देखील साजरा केला जातो.

- Advertisement -

वसुबारसची पूजा कशी करावी?

Diwali celebrations dazzle Hindu devotees worldwide | All animals photos,  Art reference photos, Cow

 

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • स्वच्छ वस्त्र परिधान करुन घराबाहेर छान रांगोळी काढावी.
  • तुमच्या घरी गाई आणि वासरु असेल तर त्यांची पूजा करावी. परंतु जर तुम्ही शहरी भागात राहात असाल तर गायी आणि तिच्या वासराच्या मूर्तीची पूजा करावी.
  • तिला निरंजनाने ओवळावे आणिगायीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा.
  • या दिवशी गायीचे दूध,तूप, दही हे पदार्थ खाण्यास वर्ज्य असतात.

हेही वाचा :

Diwali 2023 : देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी करा ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini