अश्विन महिन्याच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर, धन्वंतरी यांची या दिवशी पूजा केली जाते. आज 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशी तिथी
धनत्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:36 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:58 पर्यंत चालेल. धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळात केल्यास देवी लक्ष्मी घरात राहते.
प्रदोष काळ : संध्याकाळी 5.46 ते 8.25 पर्यंत आहे.
दीप दान करण्यासाठी शुभ वेळ – संध्याकाळी 5:46 ते 8:26
कोण आहेत भगवान धन्वंतरी?
पौराणिक कथेनुसार, भगवान धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला होता. या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे केल्याने हे देवी-देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि यामुळे घरात ऐश्वर्य, समृद्धी वाढते.
धार्मिक ग्रंथानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी हातात भांडे घेऊन समुद्रातून प्रकट झाले होते. भगवान धन्वंतरी यांना भगवान विष्णूचे अंश मानले जातात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्यासह भगवान धन्वंतरीची पूजा करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सुख-शांती नांदते.