Saturday, March 22, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwari Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwari Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हें संपूर्ण जेथें दिसे। तेथेंचि ज्ञान असे। इयेविषीं अनारिसें। बोलों नये॥ ही निरहंकारिता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे याविषयी अन्यथा बोलू नये. आणि जन्ममृत्युजरादुःखें। व्याधिवार्धक्यकलुषें। तियें आंगा न येतां देखे। दुरूनि जो॥ आणि जन्म, मृत्यू, दु:ख, रोग जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत तोच दुरून पाहतो. साधकु विवसिया। कां उपसर्गु योगिया। पावे उणेयापुरेया। वोथंबा जेवीं॥ जसे ठेव्यावर असलेल्या पिशाचाचा प्रतिबंध दूर करण्याविषयी साधक जसा दक्ष असतो अथवा योगाभ्यास येणार्‍या अडथळ्यासंबंधाने योगी जसा दक्ष असतो किंवा वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो. वैर जन्मांतरींचें। सर्पा मनौनि न वचे। तेवीं अतीता जन्माचें। उणें जो वाहे॥ जसे सर्पाच्या मनातून जन्मजन्मांतरीचे वैर जात नाही त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो. डोळां हरळ न विरे। घाईं कोत न जिरे। तैसें काळींचें न विसरे। जन्मदुःख॥ डोळ्यात गेलेला खडा जसा विरघळत नाही अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही त्याप्रमाणे जो मागील जन्माचे दु:ख विसरत नाही. ऐसऐसिया परी। जन्माचा कांटाळा धरी। म्हणे आतां तें मी न करीं। जेणें ऐसें होय॥ याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व म्हणतो की ज्या योगाने असे होईल ते मी यापुढे करणार नाही. हारी उमचावया। जुंवारी जैसा ये डाया। कीं वैरा बापाचेया। पुत्र जचे॥ पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरिता जुगार खेळणारा माणूस जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो. मारिलियाचेनि रागें। पाठीचा जेवीं सूड मागें। तेणें आक्षेपें लागे। जन्मापाठीं॥ (वडील भावाला) मारल्याचे रागाने जसा पाठचा भाऊ सूड मागतो तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो. परी जन्मती ते लाज। न सांडी जयाचें निज। संभाविता निस्तेज। न जिरे जेवीं॥ परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याची लाज केव्हाही सोडत नाही.

Manini