Saturday, March 22, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwari Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwari Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आणि मृत्यु पुढां आहे। तोचि कल्पांतीं कां पाहे।
परी आजीचि होये। सावधु जो॥
मृत्यू व पुढे कल्पाती येणारा असा इतका दूर जरी मृत्यू असला तथापि तो आजच आला असे समजून तो सावध असतो.
माजीं अथांव म्हणता। थडियेचि पंडुसुता।
पोहणारा आइता। कासे जेवीं॥
नदीत अथांग पाणी आहे असे म्हणतात. अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकट घालतो.
कां न पवतां रणाचा ठावो। सांभाळिजे जैसा आवो।
वोडण सुइजे घावो। न लागतांचि॥
अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे अवसान सांभाळावे अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी.
पाहेचा पेणा वाटवधा। तंव आजीचि होईजे सावधा।
जीवु न वचतां औषधा। धांविजे जेवीं॥
उद्याचा मुक्काम वाटमार्‍याचा आहे म्हणून आजच सावध व्हावे अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरिता धावाधाव करावी.
येर्‍हवीं ऐसें घडे। जो जळतां घरीं सांपडे।
तो मग न पवाडे। कुहा खणों॥
येणार्‍या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही तर ज्याप्रमाणे जळत्या घरात सापडतो तो जसा आपल्या सामर्थ्याने विहीर खणू शकत नाही तसे होते.
चोंढिये पाथरु गेला। तैसेनि जो बुडाला।
तो बोंबेहिसकट निमाला। कोण सांगे॥
खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो ‘मी बुडतो’ अशा ओरडण्यासह मेला, आता तो याप्रमाणे तो मेला असे कोण सांगेल?
म्हणौनि समर्थेंसीं वैर। जया पडिलें हाडखाइर।
तो जैसा आठही पाहर। परजून असे॥
म्हणून समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले, तो जसा आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो.
नातरी केळवली नोवरी। का संन्यासी जियापरी।
तैसा न मरतां जो करी। मृत्यूसूचना॥
अथवा लग्नाचा निश्चय घेऊन गडंगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याचे अगोदरच तो पुढे येणार्‍या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो.

Manini