Hindu Shastra : शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ महत्त्वाचे उपाय

ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तिच्या कुंडलीमध्ये जर शनी ग्रह मजबूत असेल तर त्या व्यक्तिला अनेक लाभ होतात. परंतु शनी जर कमजोर असेल तर अशावेळी त्या व्यक्तिच्या आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होतात.

ज्योतिष शास्त्रानुसार शनीची साडे साती कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यावर साडे सात वर्षापर्यंत असते. सध्या शनीची साडे साती मकर, धनु आणि कुंभ राशीच्या व्यक्तिंवर चालू आहे. परंतु कोणत्याही व्यक्तिच्या कुंडलीच्या आधारवर पाहिलं जातं की, त्या व्यक्तिसाठी शनीची साडे साती शुभ फळ देणारी आहे की अशुभ फळदायी देणारी आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तिच्या कुंडलीमध्ये जर शनी ग्रह मजबूत असेल तर त्या व्यक्तिला अनेक लाभ होतात. परंतु शनी जर कमजोर असेल तर अशावेळी त्या व्यक्तिच्या आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शनीच्या साडे सातीपासून वाचण्याासाठी नियमीत उपाय करायला हवे.

शनीच्या साडे साती पासून वाचण्यासाठी करा हे उपाय

  • प्रत्येक शनीवारी शनिदेवांची मनापासून पूजा-आराधना केल्याने शनी देवांची कृपा प्राप्त होईल.
  • शनी ग्रह मजबूत करण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडाची अंगठी घाला. मात्र ही अंगठी घालताना ती घोड्याच्या नालेपासून तयार केलेली असावी याची काळजी घ्यावी. कारण तेव्हाच याचा फायदा होईल.
  • प्रत्येक शनिवारी शनि स्तोत्राचे पठन करा.
  • शनिवारच्या दिवशी कावळ्याला चपाती खाऊ घाला.

साडे साती दरम्यान करू नका या गोष्टी

  • जर एखाद्या व्यक्तिच्या कुंडलीमध्ये शनीची साडे साती चालू आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारची जोखिम घेऊ नये.
  • वाहन चावलताना सावधान राहा.
  • साडे साती दरम्यान एकट्याने प्रवास करणं टाळा.
  • दारू चे सेवन करण टाळा आणि चुकिच्या कामांपासून दूर राहा.

हेही वाचा :Hindu Shastra : कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ महत्त्वाचे उपाय